ETV Bharat / state

PM Narendra Modi Rangoli : अमरावतीत साकारली पंतप्रधान मोदींची 11 हजार स्क्वेअर फूट रांगोळी - अमरावती नरेंद्र मोदी रांगोळी

अमरावती शहरात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ( PM Narendra Modi Rangoli ) 11 हजार स्क्वेअर फूट रांगोळी साकारण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह त्यांच्या महत्वपूर्ण सहा योजना सुद्धा या रांगोळीच्या माध्यमातून रेखाटण्यात आल्या आहेत. अमरावती नागपूर मार्गावर असणाऱ्या मणिरत्न हॉल ( Maniratna Hall PM Modi Rangoli ) येथे ही रांगोळी साकारण्यात आली आहे.

PM Narendra Modi Rangoli
PM Narendra Modi Rangoli
author img

By

Published : May 27, 2022, 5:40 PM IST

Updated : May 27, 2022, 6:36 PM IST

अमरावती - अमरावती शहरात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ( PM Narendra Modi Rangoli ) 11 हजार स्क्वेअर फूट रांगोळी साकारण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह त्यांच्या महत्वपूर्ण सहा योजना सुद्धा या रांगोळीच्या माध्यमातून रेखाटण्यात आल्या आहेत. अमरावती नागपूर मार्गावर असणाऱ्या मणिरत्न हॉल ( Maniratna Hall PM Modi Rangoli ) येथे अवघ्या 7 तास 7 मिनिटांत रेखाटलेल्या भव्य रांगोळीची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये केली जाणार आहे.

14 कलावंत, 6 टन रांगोळी - केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त अमरावतीच्या कलावंत माधुरी सुधा यांच्या मार्गदर्शनात एकूण 14 कलावंतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांची रांगोळी रेखाटली आहे. अवघ्या 7 तास 7 मिनिटांमध्ये 11 हजार स्क्वेअर फुटात भव्य, असे रेखाटन करताना 6 टन रांगोळी वापरण्यात आली.

रांगोळीमध्ये शासनाच्या या योजनांचे रेखाटन - केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 8 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याच्या निमित्ताने रेखाटण्यात आलेल्या या भव्य रांगोळीमध्ये केंद्रशासनाच्या 'बेटी बचाव बेटी पढाव', या योजनेसह 'प्रधानमंत्री जनधन योजना', 'प्रधानमंत्री उज्वला योजना', 'प्रधानमंत्री जन आरोग्य योजना',' प्रधानमंत्री आवास योजना', 'मेक इन इंडिया', आणि 'नमामि गंगे'या योजनांचे चिन्ह या रांगोळीत रेखाटण्यात आले आहे.

माधुरी सुधा यांचा हा 8वा विक्रम - 2011मध्ये अमरावती शहरात भव्य रांगोळी काढून माधुरी सुधा या पहिल्यांदाच प्रकाशझोतात आल्या. या नंतर लोंगेस्ट रांगोळी, बिगेस्ट रांगोळी, कराटे विथ रांगोळी, डान्स विथ रांगोळी असे एकूणच 7 विक्रम त्यांचे इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदविले गेले आहेत. आज 11 हजार स्क्वेअर फूट रांगोळीच्या माध्यमातून त्यांचा हा 8वा नवा विक्रम आशिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसह लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदविला जाणार आहे.

दोन दिवस पहाता येणार भव्य रांगोळी - मणिरत्न सभागृह येथे साकारण्यात आलेली ही भव्य रांगोळी दोन दिवस अमरावतीकरांना पाहण्यासाठी खुली करण्यात आली आहे. आज संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांच्याहस्ते या भव्य रांगोळीचे उद्घाटन करण्यात आले असून शहरातील कलाप्रेमी ही भव्य रांगोळी पाहण्यासाठी मणिरत्न सभागृहात गर्दी करीत आहेत.

हेही वाचा - Sameer Wankhede : चुकीच्या तपासाचा फटका समीर वानखेडेंना बसणार सरकारच्या कारवाईच्या सुचना

Last Updated : May 27, 2022, 6:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.