ETV Bharat / state

पेपर देण्यासाठी नेटवर्कच्या शोधात दुसऱ्या गावात पायी जात असलेल्या बहिणींवर रानडुकराचा हल्ला - अमरावती रानडुकराचा हल्ला

गावात मोबाइलला नेटवर्क मिळत नसल्याने पेपर देणे शक्य होत नाही म्हणुन नजीकच्या गावात पेपर सोडवण्यासाठी पायदळ जात असलेल्या दोन बहिणीवर रानडुक्कराने जीवघेणा हल्ला केला. ही घटना अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील बर्हानपूर या गावात घडली आहे.

Pig attack on sisters walking to another village in search of a network to write exam paper vin amravati
Pig attack on sisters walking to another village in search of a network to write exam paper in amravati
author img

By

Published : Jul 1, 2021, 9:44 AM IST

अमरावती - कोरोनामुळे मागील काही महिन्यांपासून रखडलेल्या संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावतीच्या महाविद्यालयीन परीक्षा या सध्या आता ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे. अनेक गावांत नेटवर्क नसल्याने विद्यार्थ्यांना पेपर देण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. यातच एक धक्कादायक बाब समोर आली आहे. गावात मोबाइलला नेटवर्क मिळत नसल्याने पेपर देणे शक्य होत नाही म्हणुन नजीकच्या गावात पेपर सोडवण्यासाठी पायदळ जात असलेल्या दोन बहिणीवर रानडुक्कराने जीवघेणा हल्ला केला. ही घटना अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील बर्हानपूर या गावात घडली आहे. या पैकी एका बहिणीला गंभीर दुखापत झाल्याने तिच्यावर अमरावतीच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. अश्विनी संजय काळे (वय २१ ) असे गंभीर दुखापत झालेल्या विद्यार्थीनीचे नाव आहे.

पेपर देण्यासाठी नेटवर्कच्या शोधात दुसऱ्या गावात पायी जात असलेल्या बहिणींवर रानडुकराचा हल्ला..

अश्विनी संजय काळे ही अमरावतीच्या विद्याभारती महाविद्यालयात बीएच्या द्वितीय वर्षाला तर लहान बहीण ज्ञानेश्वरी काळे ही शासकीय तंत्रनिकेतनच्या तृतीय वर्षाला आहे. त्या आपल्या महाविद्यालयाच्या ऑनलाइन प्रात्यक्षिक परीक्षा देत होत्या. पण बर्हानपूर या त्यांच्या छोट्या गावात नेटवर्कची प्रचंड अडचण आहे, त्यामुळे पेपर कसा सोडवायचा हा प्रश्न त्यांच्या समोर होता. त्यामुळे त्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या बेलोरा येथे वाचनालयात पेपर देण्यासाठी पायी निघाल्या होत्या. दरम्यान वाटेतच रानडुकराने हा हल्ला केला. यात अश्विनी ही गंभीर जखमी झाली तर ज्ञानेश्वरी ही किरकोळ जखमी झाली. तिच्यावर बेलोरा येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर अमरावती येथे एका खासगी रुग्णालयात दोघींनाही दाखल करण्यात आले. अश्विनीला गंभीर दुखापत असल्याने तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. दरम्यान या मुलींची परिस्थिती अतिशय बेताची असल्याने शासनाने सानुग्रह मदत करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

ग्रामीण भागात आजही नेटवर्कच्या अडचणी आहे. त्यामुळे ऑनलाइन शिक्षण कसे करावे असा गंभीर प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा आहे. अशीच काहीशी परिस्थिती बेलोरा या गावची आहे. या गावात नेटवर्क नाही मोबाईलचे टॉवर नाहीत. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेणे कठीण झाले आहे. या गावातील सर्व विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी अशा प्रकारे दुसर्‍या गावात जात असल्याचं येथील नागरिकांनी सांगितले. या परिसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट आहे त्यातूनच ही घटना घडली आहे. दरम्यान प्रशासनाने गावांमध्ये नेटवर्क ची
सुविधा करावी, अशी मागणी ज्ञानेश्वरी काळे हिने केली आहे.

रानडुक्कराने केलेल्या हल्ल्यामध्ये अश्विनी ही गंभीर रित्या जखमी झाली असून तिच्या मांडीला पंधरा टाके पडले आहे. खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू असून सध्या तिची प्रकृती धोक्याबाहेर असून ती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.