ETV Bharat / state

फासेपारधी समाजाचा समृद्धी महामार्गावर विविध मागण्यांसाठी ठिय्या - phase pardhi community news

मंगरूळ चव्हाळा येथील 'प्रश्नचिन्ह शाळे'चा अर्धा प्रकल्प समृध्दी महामार्गामुळे उध्वस्त झाला. हा प्रकल्प नव्याने बांधून देण्याच्या मागणीसाठी तसेच इतर विविध मागण्यांसाठी फासेपारधी समाजाच्या बांधवांनी समृध्दी महामार्गाच्या सुलतानपूर येथील मुख्य कार्यालयावर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धारही आंदोलकांनी केला आहे.

फासेपारधी समाजाचे विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन

author img

By

Published : Mar 17, 2020, 12:53 PM IST

Updated : Mar 17, 2020, 3:18 PM IST

अमरावती - जिल्ह्यातील मंगरूळ चव्हाळा येथील 'प्रश्नचिन्ह शाळे'चा अर्धा प्रकल्प समृध्दी महामार्गामुळे उध्वस्त झाला. या शाळेचा प्रकल्प नव्याने बांधून देण्यात यावे. तसेच यासारख्या विविध मागण्यांसाठी फासेपारधी समाजाच्या पालकांनी चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड जवळील सुलतानपूर येथील समृध्दी महामार्गाच्या मुख्य कार्यालयावर मंगळवार सकाळपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

फासेपारधी समाजाचे विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन

फासेपारधी सुधार समितीद्वारा संचालित 'प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा' ही २०१२ मध्ये मंगरूळ चव्हाळा येथे सुरू झाली. फासेपारधी समाजातील भिक्षा मागणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सप्टेंबर २०१२ मध्ये सामाजिक कार्यकर्ता मतीन भोसले यांनी आपल्या समाजातील मुलामुलींनी शिक्षण घ्यावे, या हेतूने या शाळेची स्थापना केली. मतीन भोसले यांच्या प्रयत्नातूनच फासेपारधी समाजातील मुले शिक्षण घेत आपले उज्ज्वल भविष्य घडवू पाहत आहेत.

या शाळेत शिकणारे विद्यार्थी शिक्षण पूर्ण करण्याचे स्वप्न मनाशी बाळगून असताना समृद्धी महामार्ग मात्र त्यात व्यत्यय ठरू पाहत आहे. सामाजिक सहकार्यातून निर्माण झालेल्या या शाळेची इमारत समृद्धी महामार्गाने उध्वस्त केली आहे. आम्हाला नवीन शाळा मिळेल का, आणि मिळेल तर कधी, अशी साशंकता विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झाली होती. तर, शासनाकडूनही योग्य तो प्रतिसाद मिळत नसतांना फासेपारधी समाजाने आजपासून समृध्दी महामार्गाच्या सुलतानपूर येथील मुख्य कार्यालयावर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

हेही वाचा - कोरोनाशी लढण्यासाठी अमरावती कारागृह सज्ज; अधीक्षक कांबळेंची माहिती

समृध्दी महामार्गामुळे उध्वस्त झालेला शाळेचा प्रकल्प नव्याने बांधुन देण्यात यावा, एका महिण्यात दोन विहीरींचे खोदकाम करून पक्के बांधकाम करून देण्यात यावे. समृध्दी महामार्गाच्या कामामुळे हादरे बसून शाळेच्या पिल्लरखाली दबून मृत्यू झालेल्या भारती बेलसरे हिच्या कुटुबियांना १० लाखांची नुकसान भरपाई देण्यात यावी. धूळीपासून संरक्षण मिळण्याकरता चारही बाजूने १० फूटांची संरक्षण भिंत बांधून देण्यात यावी, आदी मागण्यांसाठी हा ठिय्या देण्यात आला. तसेच, मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धारही आंदोलकांनी केला आहे.

हेही वाचा - कोरोनाबाबत अफवा पसरवली तर खबरदार... पोलीस आयुक्तांचा इशारा

Last Updated : Mar 17, 2020, 3:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.