ETV Bharat / state

अमरावती : धामणगाव रेल्वे येथे रक्तदान करून बाबासाहेबांना वाहिली आदरांजली

author img

By

Published : Dec 6, 2020, 11:01 PM IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने धामणगाव रेल्वे येथे रक्तदान समितीच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

people-paid-tribute-to-babasaheb-by-donating-blood-in-dhamangaon-railway-in-amravati
अमरावती : धामणगाव रेल्वे येथे रक्तदान करून बाबासाहेबांना वाहिली आदरांजली

धामणगाव रेल्वे (अमरावती) - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून धामणगाव रेल्वे येथे रक्तदान समितीच्यावतीने रक्तदान करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी ६२ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

प्रशांत मुन यांची प्रतिक्रिया

मागील सात वर्षांपासून आयोजन -

राज्यात कोरोनाचा काळ असल्याचे आंबेडकरी अनुयायांनी चैत्यभूमीवर गर्दी न करता घरूनच आदरांजली वाहण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्यातच कोरोना काळात रक्ताची गरज लक्षात घेता, अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथील रक्तदान समितीने या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. रक्तदान करून बाबासाहेबांना खरी आदरांजली वाहण्याचा संकल्प त्यांनी पूर्ण केला. धामणगाव येथील रक्तदान समिती ही मागील सात वर्षांपासून ६ डिसेंबरला रक्तदान शिबिराचे आयोजन करते. यावर्षी ही त्यांनी या शिबिराचे आयोजन केले होते.

हेही वाचा - शेतकऱ्यांच्या भारत बंदला आपचा पाठिंबा, कार्यकर्ते ८ डिसेंबरला रस्त्यावर उतरणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.