अमरावती- अमरावती शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना रुग्णाची एकूण संख्या 54 तर मृत्यूची संख्या 10 झाली आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागात सुद्धा पोलिसांच्या वतीने वाहनांची कसून तपासणी व चौकशी केली जात आहे. परतवाडा शहराच्या मुख्य प्रवेश चौकात पोलिसांकडून नाकाबंदी केली जात असून अत्यावश्यक सेवेतील वाहनाला सोडण्यात येत असून विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.
हेही वाचा- COVID-19: महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करावे, सर्वोच्च न्यायालयात जनहितयाचिका
जिल्ह्यातील परतवाडा, अचलपूर या दोन्ही शहरांची लोकसंख्या ही मोठी आहे. मागील पाच दिवसांपूर्वी बडनेरा येथील एक कोरोनाबाधित रुग्ण हा परतवाडा येथे जाऊन आला असल्याने प्रशासन अलर्ट झाले. दरम्यान परतवाडा मधून मध्यप्रदेश, मेळघाटातकडे जाणारे मार्ग व अमरावती चांदुर बाजारकडून येणारे मार्ग असल्याने वाहनांची तपासणी केली जात आहे.