अमरावती : वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी आयोध्या येथून शंकरान उचल श्री नारायण गुरु महाराज हे 1911 मध्ये गुरु परमहंस श्रीमत शंकर महाराज यांच्या शोधात अमरावतीला आले होते. अमरावती शहरातील भाजी बाजार परिसरात नागनाथ बुवा गोसावी यांच्या मठात ते राहायचे.आपले गुरु परमहंस श्रीमत शंकर महाराज यांच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी 1924 पासून आषाढी एकादशी निमीत्त अमरावती शहरालगत असणाऱ्या धांडे माऊली येथून पंढरपूरपर्यंत पायी वारीला सुरुवात केली. या वारीचे वैशिष्ट्य म्हणजे वारकरी पंढरपूर पर्यंत पायी जातात. परत देखील पाईप येतात. सुरुवातीला जुन्या शहरातील पाच-सहा जण वारीला जायचे मात्र, हळूहळू वारकऱ्यांची संख्याही 400, 500 पर्यंत वाढली. सध्या मात्र, शंभर ते दीडशे जण या वारीत सहभागी होत, असल्याची माहिती मठाचे विश्वस्त श्रीरंग हिर्लेकर यांनी 'ईटीव्ही भारत"शीबोलताना दिली.
पालखीचा 27 ठिकाणी मुक्काम : दरवर्षी ज्येष्ठ महिन्यात एकादशीच्या तीन दिवसांपूर्वी माऊली धांडे या गावातून पालखी खांद्यावर घेऊन वारकरी पंढरपूरच्या वारीला निघतात. गणोजादेवी, परलाम येथून ही वारी अमरावतीला एकादवशीच्या दिवशी पोहोचते द्वादशीला अमरावतीतून ही पालखी पुढे बडनेरा, बो,पी धनज, कारंजा मंगरूळनाथ, विठोरा, वाशिम ,कन्हेरगाव, हिंगोली, औंढानागनाथ, जवळा बाजार, परभणी, पोखणी गंगाखेड परळी वैजनाथ, आंबेजोगाई सादळेश्वर, पैठण, कळम, शेरमाळा, भगवान बार्शी , कुर्डूवाडी, शेटफळ येथून थेट पंढरपूरला पोहोचते. 27 दिवसांचा हा प्रवास असतो. आषाढी एकादशी झाल्यावर चौथ्या दिवशी पुन्हा या वारीचा परतीचा प्रवास सुरू होतो. ही वारी पंढरपूर वरून 23 दिवसात पायी चालत परत येते. मठाच्या वतीने कधीही कोणाकडून पैसे मागितले जात नाही. जे कोणी काही दान देतं ते थेट दानपेटीत येतं.
वारीदरम्यान ठरलेल्या गावांमध्ये ग्रामस्थ वारकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था करतात. ज्या ठिकाणी जेवणाची सोय झाली नाही त्या ठिकाणी मठाच्या वतीने वारकऱ्यांना भोजन दिले जाते - मनोहर अंबुलकर, मठाचे जेष्ठ पदाधिकारी
भुताची पालखी म्हणून ओळख : पूर्वीच्या काळात जुन्या अमरावती शहरात स्थित या मठातून रात्री एक वाजता कधी दोन वाजता पालखी घेऊन वारकरी पंढरपूरला निघायचे. यामुळे या पालखीला विदर्भातील भुताची पालखी असे म्हटले जायचे. पूर्वी बैलगाड्या देखील वारीत राहायच्या. त्यावेळी बैलांची सोय करणं यासह वारकऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था करणे हे सारे काही केल्या जायचे. आता बराचसा बदल झाला आहे. पूर्वीसारखी वारकऱ्यांची संख्या देखील राहिली नाही. असे असले तरी आमच्या या वारीने आता शंभराव्या वर्षात पदार्पण केले असून सर्व वारकऱ्यांमध्ये नवा उत्साह असल्याचे प्रसाद जोशी यांनी सांगितले.
हेही वाचा -
- Arvind Kejriwal : केजरीवाल मुंबईत घेणार शरद पवार, उद्धव ठाकरेंची भेट, केंद्राच्या 'या' अध्यादेशाविरोधात समर्थन मागणार
- Raj Thackeray : राज ठाकरेंनी शेतकऱ्यांना थेटच विचारले; तुम्ही मला मतदान करत नाही, मग अडचणीच्या वेळी...
- Rs 2000 Exchange : दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी तुमच्याकडे ओळखपत्र नाही? काळजी करु नका, ही बातमी वाचा