ETV Bharat / state

अमरावती: सेवा सहकारी सोसायटी कार्यालय बनले ओल्या पार्टीचा अड्डा

author img

By

Published : Apr 2, 2021, 3:03 PM IST

Updated : Apr 2, 2021, 7:43 PM IST

राजुरा येथील सहकार संस्था ही राजकारणी लोकांचा जणू अड्डाच बनली आहे. येथील सहकारी सोसायटी कार्यलयात तीन चार टोळके ओली पार्टी करताना आढळून आले आहेत

ओल्या पार्ट्या
ओल्या पार्ट्या

अमरावती -जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील राजुरा या गावातील सहकारी सोसायटी कार्यालय ओल्या पार्टीचा अड्डा झाला की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मागील काही दिवसांपासून या कार्यालयात पदाधिकारी यांच्याच जेवणाच्या ओल्या पार्ट्या रंगत असल्याचे समोर आले आहे. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. दरम्यान या गंभीर प्रकाराबाबत अनेकांनी मौन बाळगले असले तरी वरिष्ठांकडे या प्रकारची तक्रार केली जाणार असल्याची माहिती आहे.

सेवा सहकारी सोसायटी कार्यालय बनले ओल्या पार्टीचा अड्डा

हेही वाचा - ड्रग्ज प्रकरण: अभिनेता अर्जुन रामपाल साऊथ आफ्रिकेला पळून जाण्याच्या तयारीत होता- एनसीबी

पदाधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी..

सहकार क्षेत्रातून शेतकऱ्यांची व लोकांची उन्नती व्हावी हे सरकारचे धोरण आहे. परंतु राजुरा येथील सहकार संस्था ही राजकारणी लोकांचा जणू अड्डाच बनली आहे. येथील सहकारी सोसायटी कार्यलयात तीन चार टोळके ओली पार्टी करताना आढळून आले आहेत. त्यांच्या या पार्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे अशी पार्टी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारावाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा - तैवानमध्ये मोठा रेल्वे अपघात; ३४ जणांचा मृत्यू, कित्येक जखमी

Last Updated : Apr 2, 2021, 7:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.