ETV Bharat / state

चांदूर रेल्वे : महिलेने परसबागेत फुलविली सेंद्रिय ब्रोकोली

ब्रोकोलीचे पीक अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरात एका महिलेने घरातील परसबागेत यशस्वीरित्या घेतले आहे. टाळेबंदीच्या काळात मोबाईलवर आलेल्या व्हिडिओवरून हे पीक घेण्याची कल्पना महिलेला आल्याचे त्यांनी सांगितले.

सेंद्रिय ब्रोकोली
सेंद्रिय ब्रोकोली
author img

By

Published : Jan 12, 2021, 8:25 PM IST

अमरावती - ब्रोकोली म्हणजेच परदेशातील हिरव्या रंगाची कोबी असून सदर पीक अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरात एका महिलेने घरातील परसबागेत यशस्वीरित्या घेतले आहे. टाळेबंदीच्या काळात मोबाईलवर आलेल्या व्हिडिओवरून हे पीक घेण्याची कल्पना महिलेला आल्याचे त्यांनी सांगितले.

अमरावती

ब्रोकोली आणि नेहमीच्या खाण्यातील कोबी, फ्लॉवर यांचे कूळ, जाती आणि प्रजाती एकच आहेत. या भाजीचे मूळस्थान इटली हेच आहे. सदर पीक चांदूर रेल्वे शहरातील गुलमोहर कॉलनीच्या बाजूला असलेल्या बालाजीनगर येथे घेतले आहे. येथील रहिवासी पद्मा विवेक युनाते यांनी घरातील परसबागेत ऑक्टोंबर २०२० मध्ये ब्रोकोलीची लागवड सुरू केली.

बियाण्यांची ऑनलाइन खरेदी

याविषयी पद्मा युनाते यांनी सांगितले की, ब्रोकोलीच्या बियांची ऑनलाइन खरेदी करून लागवड केली होती. या पद्धतीत प्लास्टिक कपच्या माध्यमातून बी लावले. त्याच दिवशी एकदा पाणी दिले, कोंब येईपर्यंत पाणी दिले नाही. रोपे तयार करण्यासाठी २० दिवसांचा कालावधी लागला. त्यानंतर रोप जमिनीत पेरले. दोन झाडांमध्ये थोडे अंतर ठेवून लागवड केली.

दोन महिन्याचे हे पीक

जमिनीत पेरल्यानंतर आठवड्यातून एकदा रोपट्याला पाणी दिले. पिकाची परिपूर्ण वाढ होण्यासाठी ६० दिवस लागले. त्यानंतर मुख्य पीक ब्रोकोली १५ दिवसांनी उपलब्ध झाले. सदर झाडांना सूर्यप्रकाश जास्त पाहिजे, परंतु तापमान २५ अंशाहून कमी पाहिजे. त्यामुळे हे पीक फक्त हिवाळ्यात घेऊ शकतो, अशी माहिती पद्मा युनाते यांनी दिली. या झाडांची उंची ४५ ते ४६ सें.मी आहे.

सेंद्रिय पद्धतीने फवारणी व खत

रोप मोठे झाल्यावर एकदाच अळीसाठी निमऑईलची फवारणी केली व खतात सुध्दा केवळ शेणखताचा वापर केला. त्यामुळे परसबागेत हे पीक पूर्णपणे सेंद्रीय पध्दतीने घेतले. एकवेळा ब्रोकोली तोडल्यानंतर त्याच झाडावर तीन वेळा पुन्हा ब्रोकोली उगवते हे विशेष. आसपास कुठेही ब्रोकोलीचे पीक घेतल्याचे दिसत नसून चांदूर रेल्वे शहरात मात्र सदर पीक यशस्वीरित्या घेतले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.