ETV Bharat / state

Amravati News: अवकाळी पावसामुळे संत्रा उत्पादनावर संकट; शेतकऱ्यांची अवस्था बिकट - संत्रा उत्पादनावर संकट

अवकाळी पावसामुळे संत्रा उत्पादनावर संकट ओढवले आहे. जगभर प्रसिद्ध असणारा नागपुरी संत्र्यांचे सर्वाधिक उत्पादन अमरावती जिल्ह्यातील वरुड मोर्शी चांदूरबाजार या तालुक्यात घेतले जाते. संत्रा उत्पादनामुळे या भागातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या बळकट झाले आहे. परंतु, आता मात्र गत काही वर्षांपासून संत्रा उत्पादनावर प्रचंड संकट कोसळले आहे.

Amravati News
संत्रा उत्पादक
author img

By

Published : Mar 19, 2023, 6:46 AM IST

प्रतिक्रिया देताना सतीश भटकर , संत्रा उत्पादक

अमरावती : अवकाळी पावसामुळे संत्रा उत्पादन अडचणीत आले आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. संत्रा उत्पादनामुळे विदर्भातील कॅलिफोर्निया अशी ओळख असणाऱ्या वरुड आणि मोर्शीसह चांदूरबाजार अचलपूर तालुक्यातील संत्रा उत्पादकांना संत्रा लागवडीसाठी वर्षाकाठी एकरी दीड लाख रुपये खर्च येत आहे. उत्पन्न मात्र 15 हजार रुपये इतके तुटपुंजे यायला लागल्यामुळे या संपूर्ण भागातील संत्रा उत्पादक प्रचंड संकटांचा सामना करीत आहे. संत्र्यामुळे वरुड, मोर्शी,चांदूरबाजार, अचलपूर तालुक्यात अनेक शेतकरी समृद्ध झाले.

संत्र्याचा व्यापार म्हणजे अलीबाबाची गुफा : संत्र्यामुळे शेतकऱ्यांचे घरे सिमेंटची झाली. संत्र्यामुळे या परिसरातील शेतकरी समृद्ध जीवन जगायला लागले, ही वास्तविकता असली तरी आता पंधरा वर्षांपासून मात्र संत्रा जीवघेणा ठरतो आहे, अशी वेदना संत्रा उत्पादक शेतकरी सतीश भटकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली. आज मात्र संत्रा उत्पादकांची जमीन पडीक म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. या परिस्थितीसाठी बऱ्याच अंशी शासन जबाबदार आहे. संत्र्याच्या झाडाला कुठलेही संरक्षण नाही. आज संत्र्याचा व्यापार हा अलीबाबाची गुफा झाली आहे. आज संत्रा उत्पादकांना अगदी कवडीमोल दरात संत्रा विकावा लागतो, अशी परिस्थिती आहे.

शासनाच्या चुकीच्या धोरणाचा परिणाम : पूर्वी विदर्भात कापूस हेच मुख्य पीक घेतले जायचे. कापसाला भाव न मिळाल्यामुळे या भागातील शेतकरी खचले. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची आत्महत्या होऊ लागली. आता मात्र कापसाप्रमाणे संत्रा देखील शेतकऱ्यांना दगा देत आहे. यामुळे आमच्यासमोर कठीण परिस्थिती निर्माण होणार, अशी भीती अनेक संत्रा उत्पादक व्यक्त करीत आहेत. संत्राबाबत सरकारचे चुकीचे धोरण देखील या परिस्थितीसाठी कारणीभूत असल्याचा आरोप संत्रा उत्पादकांकडून केला जातो आहे.

संत्रा उत्पादक तोडत आहेत शेतातील झाड : उत्पन्न कमी आणि खर्च प्रचंड करावा लागत आहे. त्यामुळे संत्रा उत्पादक हैराण झाले आहेत. जिल्ह्यातील अनेक भागात संत्रा उत्पादक आपल्या शेतातील झाडे तोडत आहेत. चांदूर बाजार तालुक्यातील माधान या गावात शेतकऱ्यांनी जवळपास 10 हजाराच्या वर संत्र्याची झाडे तोडून टाकली आहे, अशी माहिती देखील सतीश भटकर यांनी दिली. पंधरा वर्ष संत्र्याची झाडे पोसण्यापेक्षा ही झाडे तोडून नवीन पीक घेणे, हा या मागचा उद्देश असल्याचे देखील सतीश भटकर म्हणाले. यावर्षी परिस्थिती सर्वाधिकट आहे. त्यामुळे आता शेतातील उरलीसुरली सर्व संत्र्याची झाडे तोडून टाकणे, असाच विचार शेतकरी करीत आहेत. ऑक्टोबर महिन्यापासून संत्रा तापमानामुळे खराब झाला. जिल्ह्यात अनेक भागात किडीमुळे संत्रा गळून पडला. आता जून महिन्यात मृगबहार आला नाही, तर ऑक्टोबर महिन्यात संत्र्याची सर्व झाडे तोडून जगण्यासाठी नवा पर्याय शेतकऱ्यांना शोधावा लागेल, असे देखील सतीश भटकर यांनी स्पष्ट केले.

संत्रा उत्पादन अडचणीत : जिल्ह्यात मोर्शी आणि वरुड तालुक्यात एकूण उत्पादनाच्या 40 टक्के संत्री आकाराने लहान आहे. त्यामुळे त्यांना योग्य भाव मिळाला नाही. यामुळे अनेक शेतकऱ्यांना मातीमोल भावाने संत्रा विकावा लागला. अनेकांनी तर संत्रा फेकून दिला. आता मार्च महिना सरायला लागला असताना देखील संत्र्याच्या झाडावर डिंक या कोळशीचा प्रादुर्भाव, नैसर्गिक आपत्ती सिंचनाचे नगण्य प्रमाण, जिल्ह्यात संत्रा प्रक्रिया उद्योगांचा अभाव, निर्यात शून्य धोरण फळपीक, विम्यातील अनेक अडचणी अशा विविध कारणांमुळे जिल्ह्यातील संत्रा उत्पादन अडचणीत आले आहे.

हेही वाचा : Eknath Shinde on Farmers Help : अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रसंगी निकष डावलून मदत - मुख्यमंत्री

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.