अमरावती - मेळघाट परिसरातील बोदू गावाच्या बिट वनखंडामध्ये रस्त्याने जात असलेल्या एका व्यक्तीवर अस्वलीने हल्ला चढवला. यात दिनेश बेठेकर हे गंभीर जखमी झालेत. त्यांनी अस्वलीशी झुंज देऊन स्वतःची कशीबशी सुटका केली आणि अस्वलीला पळवून लावले.
दरम्यान, परिसरातील नागरिकांशी संपर्क साधून त्यांनी चरणी रुग्णालय गाठले. गंभीर जखमी झालेल्या दिनेश बेठेकर यांची प्रकृती सद्या स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितले असले तरी त्यांना गंभीर इजा असल्याने डॉक्टरांनी ७० हुन अधिक टाके त्यांना लावले आहेत. सद्या त्यांना चूरणी ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले आहे..
यापूर्वी ही अनेकांवर जीवघेणे हल्ले
मेळघाटमध्ये यापूर्वी अनेक शेतकऱ्यांवर जीवघेणे हल्ले अस्वलीकडून झाले आहेत. यामध्ये अनेक आदिवासींना आपले प्राण गमवावे लागल्याच्या घटना ताज्या असतानाच पुन्हा एकदा अस्वलीने हल्ला केल्याची घटना समोर आल्याने आदिवासींमध्ये खळबळ उडाली आहे.