ETV Bharat / state

अमरावतीत उष्माघाताने एकाचा बळी - रमेश बुंदीले

अमरावतीच्या धामणगावात उष्णघाताने एका वयोवृद्ध नागरिकाचा मृत्यू झाला आहे. उष्माघाताने बळी जाण्याची धामणगाव तालुक्यातील ही पहिली घटना आहे.

रमेश बुंदीले
author img

By

Published : May 26, 2019, 8:09 AM IST

Updated : May 26, 2019, 1:29 PM IST

अमरावती - धामणगाव रेल्वे तालुक्यात शनिवारी ४ वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीचा उष्माघाताने मृत्यू झाला. रमेश पांडुरंग बुंदीले असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते निंभोरा बोडखा येथील रहिवासी आहे.

रमेश बुंदीले

बुंदीले (५२) हे शनिवारी सायकलीने पुलगाव येथे काही कामानिमित्त गेले होते. त्यानंतर दुपारी गावाकडे परत येत असताना त्यांना झाडगाव येथे तहान लागली. ते एका विहिरीजवळ पाणी पिण्यासाठी गेले. मात्र, तेथे त्यांना पाणी मिळाले नाही. त्यानंतर एका शेतात झाडाखाली बसले असताना त्यांचा उष्माघाताने मृत्यू झाला. शनिवारी धामणगाव तालुक्यात ४६ डिग्री तापमानाची नोंद झाली. या तापमानवाढीमुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

बुंदेल यांच्यामागे १ मुलगा ४ मुली असा मोठा परिवार आहे. उष्माघाताने बळी जाण्याची धामणगाव तालुक्यातील ही पहिली घटना आहे. बुंदेलेंचा मृत्यू उष्माघातामुळे झाला असल्याची माहिती येथील पोलीस पाटील विशाल बांते यांनी दिली.

Intro:अमरावतीच्या धामणगावात उष्णघाताने इसमाचा बळी

अमरावती अँकर
दहा किलोमीटर सायकल ने प्रवास करीत असताना वाढत्या तापमानात पाणी न मिळाल्यामुळे ५२ वर्षीय इसमाचा पाण्या विना तडपडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी चार वाजता अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे
तालुक्यात घडली रमेश पांडुरंग बुंदीले असे मृतक इसमाचे नाव असून तो निंभोरा बोडखा येथील रहिवासी आहे .

आज सकाळी पुलगाव येथे सायकलने कामानिमित्त गेला होता त्यानंतर दुपारी गावाकडे परत येत असताना झाडगाव येथे तहान लागली मात्र विहिरीवर पाणी मिळाले नाही एका शेतात झाडाखाली बसले असताना पाणी न मिळाल्याने जागीच मृत्यू झाला आज धामणगाव तालुक्यातील उच्चंक तापमानाची नोंद झाली 46 डिग्री तापमान होते मृतक रमेश बुंदेल यांच्यामागे एक मुलगा चार मुली असा मोठा परिवार आहे उष्माघाताने बळी जाण्याची धामणगाव तालुक्यातील ही पहिली घटना आहे संबंधित व्यक्तीचा उष्माघातामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती येथील पोलीस पाटील विशाल बांते यांनी दिलीBody:अमरावतीConclusion:अमरावती
Last Updated : May 26, 2019, 1:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.