अमरावती - अमरावती ते पांढुरणा मार्गावर दुचाकी आणि चारचाकीचा अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू, तर ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. नाजूक तायडे असे या अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. नाजूक तायडे हा निंभी गावाला जात असतााना हा अपघात घडला.
हेही वाचा - वाघोबा खिंड येथे ट्रकचा अपघात; चालक व क्लिनर बचावले
अमरावती ते पांढुरणा मार्गावर दुचाकी आणि चारचाकीचा अपघात झाला. लेहगाव जवळील परिसरात दुचाकीला ओव्हरटेक करताना कार आणि दुचाकीची धडक झाली. या अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू झाला असून ४ जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींध्ये ३ पुरुष तर एका महिलेचा समावेश आहे.