ETV Bharat / state

अमरावती विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचारी झाला कोरोनायोद्धा; चाचणी प्रयोगशाळेत देत आहे सेवा - अमरावती विद्यापीठ कोरोना चाचणी प्रयोगशाळा

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसरात कोरोना स्वॅब चाचणी प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे. विद्यापीठ परिसरात ही प्रयोगशाळा सुरू होताच अनेकांनी हे विद्यापीठासाठी सुरक्षित नाही, अशी भीती व्यक्त केली होती. मात्र, विद्यापीठात शिक्षकेतर कर्मचारी असणाऱ्या संजय ठाकूर यांनी प्रयोगशाळेत सेवा देण्यासाठी स्वत: पुढाकार घेतला.

Corona Testing Lab
कोरोना चाचणी प्रयोगशाळा
author img

By

Published : May 31, 2020, 4:51 PM IST

अमरावती - संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसरात कोरोना स्वॅब चाचणी प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे. या प्रयोगशाळेत विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी संजय ठाकूर सेवा देत आहेत. विद्यापीठात कनिष्ठ सहायक असणारे संजय ठाकूर हे 22 एप्रिलपासून ही सेवा देत आहेत.

अमरावती विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचारी झाला कोरोना योद्धा

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात सुरू झालेल्या कोरोना चाचणी प्रयोगशाळेत बायोटेक्नोलॉजी विभागातील सहायक प्राध्यापक डॉ. प्रशांत ठाकरे याच्या नेतृत्वात काम सुरू आहे. डॉ. ठाकरे यांच्या सोबत बायोटेक्नोलॉजी (सूक्ष्मजीवशास्त्र) विभागातील सहायक प्राध्यापक डॉ. नीरज धनवटे आणि बॉटनी (वनस्पतीशास्त्र) विभागातील सहायक प्राध्यापक डॉ. प्रशांत गावंडे या प्रयोगशाळेत सेवा देत आहेत. त्यांच्या सोबत दहा ते बारा विद्यार्थीही स्वॅबची चाचणी घेणे, अहवाल तयार करणे आदी काम करत आहेत.

या शिक्षक आणि विद्यार्थ्यांसोबत काम करण्याची जबाबदारी द्यावी, असा विनंती अर्ज विद्यापीठात काम करणाऱ्या संजय ठाकूर यांनी 14 एप्रिल रोजी कुलसचिवांना दिला. कुलसचिव आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनुसार संजय ठाकूर हे 22 एप्रिलपासून या प्रयोगशाळेत कनिष्ठ सहायक म्हणून रुजू झाले. या प्रयोगशाळेत वरिष्ठांनी दिलेली जबाबदारी पूर्ण करणे, जिल्हा तसेच आरोग्य प्रशासनासोबत पत्र व्यवहार करणे, असे काम ठाकूर करतात.

विद्यापीठ परिसरात कोरोना चाचणी प्रयोगशाळा सुरू होताच अनेकांनी ही प्रयोगशाळा विद्यपीठासाठी सुरक्षित नाही, अशी भीती व्यक्त केली होती. विद्यापीठात सध्या कोणीही अधिकारी, कर्मचारी फिरकत नाही. सर्व विभाग बंद आहेत. असे असताना संजय ठाकूर यांनी स्वत: प्रयोगशाळेत काम स्वीकारले. प्रयोगशाळेत काम करताना आपण सुरक्षित आहोत आणि या प्रयोगशाळेमुळे कोणालाही कुठलाही धोका नसल्याचे संजय ठाकूर यांनी यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना स्पष्ट केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.