ETV Bharat / state

लॉकडाऊन : वाजंत्री व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ; लग्न समारंभ रद्द झाल्याने आर्थिक फटका

सध्या कोरोना विषाणूवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. यामध्ये जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व दुकाने आणि व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत.

banjo squad in amravati
लॉकडाऊनमुळे वाजंत्री व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ
author img

By

Published : Apr 1, 2020, 10:48 AM IST

अमरावती - लग्नकार्यात गर्दी टाळण्यासाठी घरगुती स्तरावर विवाह सोहळे करण्याच्या किंवा पुढे ढकलण्याच्या सुचना सरकारकडून देण्यात आल्या आहेत. तसेच गर्दी टाळण्यासाठी शाही लग्नसमारंभ करण्यावर शासनाने बंदी घातली आहे. याचा सर्वात मोठा फटका वाजंत्री व्यवसायिकांना बसतो आहे. कित्येक वाजंत्री व्यवसायिकांवर यामुळे उपासमारीची वेळ आली आहे.

लॉकडाऊनमुळे वाजंत्री व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ

हेही वाचा... स्टेट बँकेचे कर्मचारी पंतप्रधान निधीकरता १०० कोटींची करणार मदत

अमरावती जिल्ह्यात हजारो वाजंत्री व्यावसायिक आहेत. त्यातही ग्रामीण भागात गोरगरीब वाजंत्री व्यवसायिक आहेत. लगीनसराईत वाद्य वादन करून ते आपला चरितार्थ चालवत असतात. परंतु सध्या लॉकडाऊनमुळे शहरी व ग्रामीण भागातील वाजंत्री व्यावसायिक घरीच बसले आहेत. लग्न समारंभ असो किंवा अंत्ययात्रा वाजंत्री व्यवसायिकांना रोजगार मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या संदर्भात सरकारने लक्ष द्यावे आणि वाजंत्री व्यावसायिकांना मदत करावी, अशी विनवणी त्यांनी शासनाकडे केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.