ETV Bharat / state

एनआयएची मोठी कारवाई! अमरावतीसह देशभरातील 19 ठिकाणी छापेमारी

NIA raids today : राष्ट्रीय तपास संस्थेनं आज (18 डिसेंबर) अमरावतीसह दहशतवादी मॉड्यूल नेटवर्कमधील 19 ठिकाणांचा शोध घेतला. यामध्ये अमरावतीच्या अचलपूर येथील एका युवकाचीही चौकशी करण्यात आलीय.

NIA searches 19 locations in terror module network including some places in maharashtra
एनआयएची मोठी कारवाई! अमरावतीसह देशभरातील 19 ठिकाणी छापेमारी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 18, 2023, 1:57 PM IST

अमरावती NIA raids today : राष्ट्रीय तपास संस्थेनं आज (18 डिसेंबर) पहाटेपासून 19 हून अधिक ठिकाणी छापेमारी केली आहे. जिहादी दहशतवादी गटाचा पर्दाफाश करण्याच्या संदर्भात शोध सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलं. तसंच मागील आठवड्यात, एनआयएनं 43 हून अधिक ठिकाणी शोध घेतला आणि IS मॉड्यूल प्रकरणाशी संबंधित 15 लोकांना अटक केली. छापेमारीदरम्यान दहशतवादविरोधी तपास यंत्रणेनं मोठ्या प्रमाणात शस्त्रे, धारदार अवजारे, कागदपत्रे आणि विविध डिजिटल उपकरणे जप्त केली होती. यासंदर्भात अधिक माहिती देत एनआयएच्या एका अधिकार्‍यानं सांगितलं होतं की, आरोपी परदेशी हँडलर्सच्या निर्देशानुसार भारतात कार्यरत होते, आणि देशातील दहशतवादी कारवायांमध्ये सक्रियपणे सहभागी होते.

अचलपूरमध्ये युवकाची चौकशी : राष्ट्रीय तपास संस्थेकडून आज देशातील 19 ठिकाणी छापेमारी करण्यात आली. यामध्ये अमरावतीचा समावेश आहे. याप्रकरणी अमरावतीतील अचलपूर येथील एकाची चौकशी करण्यात आली. एनआयएचे पथक सोमवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास अचलपूर येथील अकबरी चौक परिसरात धडकले. एनआयएच्या पथकानं अकबरी चौक येथील एका युवकाची चौकशी सुरू केली. मिळालेल्या माहितीनुसार या युवकाच्या हालचालींवर एनआयए अनेक दिवसांपासून लक्ष ठेवून होती. सकाळी सहा वाजेपर्यंत या युवकाची चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर येत असून हा युवक नागपूर येथे शिक्षण घेत असल्याचं देखील समोर आलंय.

19 वर्षीय तरूणाची पुण्यात चौकशी : पुण्यातील गुलटेकडी येथे देखील राष्ट्रीय तपास संस्थेकडून छापेमारी करण्यात आली. 19 वर्षीय साफवान शेखची एनआयएकडून चौकशी करण्यात आली आहे. साफवान शेख पुलगेट येथील अरिहंत महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. इसिसकडून चालवण्यात आलेल्या टेलिग्राममध्ये साफवानचा सहभाग असल्याचा संशय एनआयएला आहे. आज चौकशीदरम्यान साफवानजवळील इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस जप्त करण्यात आले.

एनआयएचे महाराष्ट्रात 43 ठिकाणी छापे : यापूर्वी 9 डिसेंबर रोजी राष्ट्रीय तपास संस्थेने महाराष्ट्रातील 43 ठिकाणी छापेमारी केली होती. यावेळी 15 जणांना ताब्यात घेण्यात आलं. शाकिब नाचन, हासिब मुल्ला, मुसाब मुल्ला, रेहान सुसे, फरहान सूसे, फिरोझ कुवार, आदिल खोत, मुखलिस नाचन, सैफ आतिक नाचन,याह्या खोत राफिल नाचन, राझील नाचन, शकूब दिवकर, कासीफ बेलारे आणि मुंझिर केपी अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.

पाच दहशतवाद्यांना अटक : राष्ट्रीय तपास संस्थेच्या पथकानं 11 ऑगस्टला स्थानिक पोलिसांच्या मदतीनं भिवंडी तालुक्यातील पडघा-बोरिवली गावात छापेमारी केली होती. या छापेमारीत एनआयएनं 'आयसिस' दहशतवादी संघटनेशी संबंधीत आरोपीला अटक केली. शमील साकिब नाचण असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पडघा-बोरीवलीमधून यापूर्वी चार जणांना दहशतवादी कारवाईच्या संशयावरून अटक करण्यात आली. शमीलचा नातेवाईक अकिब नाचण, शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला अशी संशयित दहशतवाद्यांची नावे आहेत.

हेही वाचा -

  1. एनआयएचे महाराष्ट्रात 43 ठिकाणी छापे: राज्यभरातून अनेकांना घेतलं ताब्यात
  2. विशाखापट्टणम पाकस्तान हेरगिरी प्रकरण ; एनआयएनं मुंबईतून एका आरोपीला केलं अटक
  3. ISIS Module Case : इसिस प्रकरणात आरोपपत्र दाखल; 69 दिवसांची मुदतवाढ एनआयए न्यायालयानं फेटाळली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.