अमरावती - कोरोना चाचणीचे अहवाल गतीने मिळण्यासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत नवी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे या लॅबकडून आता दिवसाला 1,700 अहवाल मिळणार आहेत. आरोग्य यंत्रणेला अहवाल वेळेत कळण्यासाठी स्वतंत्र सॉफ्टवेअरही विकसित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज सकाळी लॅबची पाहणी करून तज्ज्ञांशी चर्चा केली.
तत्काळ अहवाल, तत्काळ उपचार -
कोरोना साथीच्या प्रतिबंधासाठी स्थानिक पातळीवर अहवाल देणारी प्रयोगशाळा असावी म्हणून दहा महिन्यांपूर्वी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात लॅब सुरू करण्यात आली. पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी त्यासाठी पाठपुरावा करून निधी मिळवून दिला. सुरुवातीच्या काळात या लॅबमध्ये दिवसाला शंभर नमुने तपासले जात होते. मात्र, साथीचा प्रादुर्भाव लक्षात घेता ही क्षमतावाढ करत हजारपर्यंत नेण्यात आली. दरम्यान, पीडीएमसी रूग्णालयातही चाचण्यांची सुविधा झाली. अहवाल तत्काळ मिळून रूग्णांना वेळेत उपचार मिळवणे शक्य झाले. या कामाला आणखी गती मिळावी म्हणून आता विद्यापीठात नवी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे, अशी माहिती नवाल यांनी दिली.
अमरावती विद्यापीठात कोरोना चाचणीसाठी नवी यंत्रणा कार्यान्वित, प्रतिदिन मिळणार 1,700 अहवाल - अमरावती विद्यापीठात कोरोना चाचणी
कोरोना चाचणीचे अहवाल गतीने मिळण्यासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत नवी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे या लॅबकडून आता दिवसाला 1,700 अहवाल मिळणार आहेत.