ETV Bharat / state

पश्चिम विदर्भात गुरुवारी ६४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद, तर २ जणांचा मृत्यू - अमरावती कोरोना रुग्ण संख्या

अमरावतीमध्ये आतापर्यंत २२९ रुग्ण बरे झाले असून, ५८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यवतमाळमध्ये गुरुवारी दोन नव्या रुग्णांची नोंद झाल्याने रुग्णांची संख्या १६५ झाली आहे.

amravati covid 19
अमरावती जिल्हा रुग्णालय
author img

By

Published : Jun 12, 2020, 1:16 PM IST

अमरावती - राज्यात कोरोना रुग्णाच्या वाढीचा कहर सुरू आहे. अशातच पश्चिम विदर्भात देखील रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गुरुवारी पश्चिम विदर्भातील एकूण ६४ नव्या रुग्णांची नोंद झाली असून, दोन रुग्णाचा मृत्यू झाला आहे. रुग्णवाढीमध्ये गुरुवारी अकोल्यात सर्वाधिक ३० नव्या रुग्णांची नोंद झाली असून, सर्वाधिक कमी २ रुग्णांची नोंद यवतमाळ जिल्ह्यात झाली आहे. पश्चिम विदर्भात आतापर्यंत एकूण १ हजार ५१५ रुग्ण संख्या असून, ६८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर १ हजार ८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

गुरुवारी पश्चिम विदर्भातील अकोला जिल्ह्यात ३०, अमरावती १४, बुलडाणा १३ आणि यवतमाळ दोन, अशा एकूण ६४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. अकोला जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता ९१४ वर पोहोचली आहे, तर गुरुवारी एका रुग्णाचा मृत्यू झाला. सध्या २९४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अमरावतीमध्ये गुरुवारी १४ नवे रुग्ण आढळल्याने जिल्ह्याची रुग्ण संख्या ३०४ झाली आहे.

अमरावतीमध्ये आतापर्यंत २२९ रुग्ण बरे झाले असून, ५८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यवतमाळमध्ये गुरुवारी दोन नव्या रुग्णांची नोंद झाल्याने रुग्णांची संख्या १६५ झाली आहे. दरम्यान, आतापर्यंत १२४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आणि दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून, आता ३६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.