अमरावती : मुंबईच्या ठाकरेंची दहशत काल होती, आज आहे आणि उद्याही राहणार आहे, असं वक्तव्य आमदार देवेंद्र भुयार (NCP MLA Devendra Bhuyar threat) यांनी केले. तुमची दहशत नदीच्या काठापर्यंत. आमच्या नादाला लागायचे नाही. निवडणुकीमध्ये जाणीवपूर्व तुम्ही धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. यानंतर जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला धक्का लावण्याचे काम केले तर तलवारीने हात छाटल्याशिवाय राहणार नाही (NCP workers will cut off hand with sword), असा इशारा आमदार देवेंद्र भुयार यांनी विरोधकांना दिला. वरुड येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्याला (NCP workers meeting in Varud) आमदार भुयार यांनी संबोधित करताना विरोधकांना धारेवर धरले.
नादाला लागू नका - या देवेंद्र भुयारच्या नादाला लागलात तर तुमची पाटीलकी काढल्याशिवाय राहणार नाही, असा सज्जड दमही आमदार भुयार यांनी दिला. 50 गद्दार गुजरात मार्गे गुवाहाटीला गेले आणि चांगले सरकार पडले. अलिबाबा चाळीस चोराच्या सरकारने आमचा कोट्यवधीचा निधी रोखला आहे. काही लोकं मला जाणीवपूर्वक बदनाम करतात, असेही भुयार यांनी म्हटले.