ETV Bharat / state

आचारसंहिता भंग प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख आणि नवनीत राणा निर्दोष

मागील लोकसभा निवडणूक काळात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांच्यावर खटला दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. जिल्हा सत्रन्यायालयाने अनिल देशमुख आणि नवनीत कौर राणा यांच्यासह 16 जणांना निर्दोष मुक्त केले आहे.

anil deshmukh news
आचारसंहिता भंग प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख निर्दोष
author img

By

Published : Nov 1, 2020, 5:27 AM IST

अमरावती - मागील लोकसभा निवडणूक काळात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांच्यावर खटला दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने अनिल देशमुख आणि नवनीत कौर राणा यांच्यासह 16 जणांना निर्दोष मुक्त केले आहे.

खासदार नवनीत राणा यांचा लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह 16 जणांवर अमरावती शहरातील गाडगे नगर पोलीस स्टेशनमध्ये भादंवि कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्यावर निर्णय देताना जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एफ.ए. देशपांडे यांनी सर्व आरोपींनी निर्दोष मुक्त केले. फिर्यादी पक्षाने या प्रकरणी थेट न्यायालयात धाव न घेता पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यामुळे फिर्यादी पक्षानं केलेली याचिका न्यायालयाने रद्दबातल ठरवत, सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत नवनीत कौर राणा यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं समर्थन मिळालं होतं. राणा यांनी भव्य रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यावेळी विद्यमान गृहमंत्री अनिल देशमुख, डॉ. राजेंद्र गवई, रावसाहेब शेखावत, बाबा राठोड, हर्षवर्धन देशमुख, गणेश खारकर, संगीता ठाकरे, अभिनंदन पेंढारी, पुष्पाताई बोंडे, सुनील वऱ्हाडे, रामेश्वर अभ्यंकर, गणेश राय, जितु दुधाने, ज्योती सैरासे, प्रशांत कांबळे,. रसीद खाँ हिदायत खाँ आदी यावेळी उपस्थित होते.

नवनीत कौर यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी निवडणूक नियंत्रण कक्षाचे फ्लाईंग स्कॉड अधिकारी जितेंद्र देशमुख यांनी गाडगे नगर पोलीस स्टेशनध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानुसार जिल्ह्यात जमावबंदी कायदा लागू असताना रॅली काढून आचारसंहीतेचा भंग केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. यावेळी राणा तसेच अनिल देशमुख यांसह 16 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणी 17 जणांच्या साक्ष नोंदवण्यात आल्या. मात्र, निवडणूक नियंत्रक अधिकारी जितेंद्र देशमुख यांनी या प्रकरणी थेट न्यायालयात धाव न घेता पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यामुळे फिर्यादी पक्षानं केलेली याचिका न्यायालयाने रद्दबातल ठरवली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.