Narmada Circumambulation : सायकलवरस्वार होऊन केली नर्मदा परिक्रमा; अमरावतीच्या शशी ठवळी यांनी केला 3300 किलोमीटरचा प्रवास - Shashi Thavali of Amravati Traveled 3300 km
अमरावती शहरातील ध्येयवेढा छायाचित्रकार शशी ठवळी यांनी 3 हजार तीनशे किलोमीटरची नर्मदा परिक्रमा सायकलवरस्वार होऊन पूर्ण केली. अतिशय खडतर असणारा हा प्रवास त्यांनी 27 दिवसांत पूर्ण केला. त्याबाबत त्यांच्याशी बातचीत करून त्यांचे अनुभव जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

अमरावती : अमरावती शहरातील गाडगेनगर परिसरातील रहिवासी असणारे शशी ठवळी यांनी एक जानेवारी रोजी सायकलने ओंकारेश्वर येथून नर्मदा परिक्रमेची सुरुवात केली. ओंकारेश्वर रेवासागर, बुरुज महेश्वर, बरेली, जबलपूर अमरकंटक, नरसिंगपूर, होशंगाबाद आणि ओंकारेश्वर अशी तीन हजार ते 30 किलोमीटरची परिक्रमा त्यांनी सायकलवरस्वार होऊन एकट्याने पूर्ण केली.
शशी ठवळी यांना 69 दिवसांचा कालावधी : ही परिक्रमा पूर्ण करण्यास शशी ठवळी यांना 69 दिवसांचा कालावधी लागला. या कालावधीत दररोज शंभर ते सव्वाशे किलोमीटरचा प्रवास त्यांनी सायकलने केला. सकाळी आंघोळ करून प्रवासादरम्यान मिळेल त्या नर्मदा नदीकाठच्या आश्रमात किंवा मंदिरात त्यांचे रात्रीचे वास्तव्य होते. सकाळी जेवण न करता केवळ मिळेल ते फळाहार करणे आणि रात्रीला जेवण करणे, असा माझा या परिक्रमेदरम्यान नित्यक्रम होता, असे शशी ठवळी 'ई-टीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.
नद्यांची स्वच्छता हाच उद्देश : देशातील सर्वच नद्या या 'स्वच्छ आणि सुंदर असाव्यात, यामुळे आपले पर्यावरणदेखील आरोग्यदायी राहील, हाच उद्देश घेऊन मी नर्मदा परिक्रमेसाठी निघालो आहे, असे शशी ठवळी यांनी सांगितले. पर्यावरण उत्कृष्ट राहिले तर पृथ्वीवरील सर्व सजीव प्राणी तसेच मनुष्याचे आरोग्य ठणठणीत राहू शकेल. नर्मदा परिक्रमा प्रत्येकाने करायला हवी. नर्मदा परिक्रमेच्या माध्यमातून निसर्गदेवतेची पूजा सेवाभाव प्राणीमात्रांचा आदर लोकांविषयी समर्पण हे भाव मला शिकायला मिळाले असेदेखील शशी ठवळी यांनी सांगितले.
असा होता प्रवास : ओंकारेश्वर येथून सुरू झालेली नर्मदा परिक्रमा ही ओंकारेश्वर येथेच संपली. एक जानेवारीपासून या प्रवासाला मी एकट्याने सुरुवात केली होती. अतिशय खडतर मार्ग डोंगर-दऱ्यांमधून सायकल चालवावी लागली. हा एक थरारक अनुभव होता. या प्रवासादरम्यान आलेल्या अडथळ्यांमुळे तीन दिवस मला एकाच ठिकाणी मुक्काम करावा लागला. रोज सकाळी दिवस उजाडताच प्रवासाला निघायचो. शंभर ते सव्वाशे किलोमीटर असा रोजचा प्रवास व्हायचा. आज हा प्रवास पूर्ण करून मी घरी परतलो. आता दोन दिवसांपासून मी सायकल चालवली नसल्यामुळे मला थकवा जाणवतो आहे. मात्र पुन्हा नव्या दमाने सायकल चालवणे हा माझा नित्यक्रम सुरू ठेवला तर माझी एनर्जी कायम राहील असे देखील शशी ढवळी म्हणाले.