ETV Bharat / state

Nana Patole On Rahul Gandhi: नकली इव्हेंट शिवाय राहुल गांधींची जगभर क्रेझ, सत्ताधारी महाराष्ट्र लुटून सुरतेला देत आहेत : नाना पटोलेंचा घणाघात - नाना पटोलेंचे राहुल गांधींवर मत

Nana Patole On Rahul Gandhi : राहुल गांधी यांना प्रसिद्धीसाठी नकली इव्हेंटची गरज नाही, असं मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष राहुल गांधी यांनी मांडलंय. ते अरावतीत पत्रकार परिषदेत बोलत होते. विभागातील पाच जिल्ह्यातील पक्षाच्या कार्याचा यावेळी पटोले यांनी आढावा घेतला.

Nana Patole On Rahul Gandhi
नाना पटोले
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 11, 2023, 7:04 PM IST

नाना पटोले यांची राहुल गांधींवर स्तुतिसुमने तर शासनावर टीका

अमरावती Nana Patole On Rahul Gandhi: कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर देशातील लोकांचा विश्वास वाढतो आहे. सोशल मीडियावर असो किंवा वैयक्तिक पातळीवर लोकांच्या राहुल गांधींकडून अपेक्षा वाढल्या आहेत. राहुल गांधी यांची देशातच नव्हे तर परदेशात देखील क्रेझ (Rahul Gandhi craze) आहे. हे सारं काही करण्यासाठी त्यांना कुठले खोटे किंवा नकली (Nana Patole Amravati Tour) इव्हेंट करण्याची गरज नाही. (Congress Worker Review Meeting) अशा नकली इव्हेंटशिवाय देखील त्यांची सर्वत्र क्रेझ असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज (बुधवारी) अमरावतीत म्हणाले. (Nana Patole PC Amaravati) येथे विभागातील पाचही जिल्ह्यांच्या काँग्रेस कार्यकर्त्यांची स्वतंत्र आढावा बैठक कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज (बुधवारी) अमरावती येथील काँग्रेस भवनात घेतली. त्यानिमित्ताने त्यांनी पत्रकारांशी देखील संवाद साधला.

शेतकऱ्यांना आत्महत्येसाठी बाध्य करणारं सरकार : राज्यातील जनतेच्या प्रश्नांशी सरकारला काहीही घेणं देणं नाही. सध्या राज्यात कॉमेडी सरकार सुरू आहे. यामध्ये पालकमंत्री पदावरून देखील भांडणं होत आहेत. जनतेच्या प्रश्नांपेक्षा बिनाकामाच्या विषयांवरच या सरकारमधील लोक बोलत आहेत. यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे राज्यातील शेतीची परिस्थिती बिकट आहे. पश्चिम महाराष्ट्र असो किंवा विदर्भ सर्वच भागात शेतकरी अडचणीत आहेत. पाऊस कमी झाल्यामुळे आणि अनेक रोग असल्यामुळे कापूस आणि तुरीचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत राज्यातलं झोपी गेलेलं आणि भ्रष्टाचारी सरकार शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यासाठी बाध्य करीत आहेत, असा आरोप देखील नाना पटोले यांनी केला.

सरकारकडून जनतेची लूट : आता निवडणुका समोर आल्यामुळे केंद्र शासनाने गॅस सिलेंडरचे दर हे 300 रुपयांनी कमी केले आहे. मुळात गॅस सिलेंडर तसंच पेट्रोल, डिझेल यांच्या माध्यमातून सरकार जनतेची आर्थिक लूट करत आहेत. गॅस सिलेंडरवर जे काही तीनशे रुपये या सरकारने कमी केले आहे खरं तर आतापर्यंत कुठलेही कारण नसताना या सरकारने गॅस सिलेंडर मागे तीनशे रुपये लुटण्याचे काम केले असल्याचे देखील नाना पटोले म्हणाले.

जनतेला निवडणुकीची वाट : खरंतर देशातील जनता या सरकारला कंटाळली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता दोन वर्ष होत आली तरी हे सरकार घ्यायला तयार नाही. जनतेचा कौल या सरकारला माहीत असल्यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास हे सरकार घाबरत आहे. या निवडणुका झाल्या नसल्यामुळे अनेक शहरात महापालिका आणि शासन प्रचंड भ्रष्टाचार करीत आहे. शहरांमध्ये नागरी सुविधांचा प्रचंड अभाव दिसतो आहे, असे देखील नाना पटोले म्हणाले.

हे महाराष्ट्र लुटून सुरतला देणारे : आम्ही मोदी आणि शहांचे हस्तक आहोत असं स्वतः मुख्यमंत्री बोलले होते. खरंतर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे आहोत. आम्ही सुरतेला लुटून महाराष्ट्रात आणणारे आहोत; मात्र आज सत्ताधारी मंडळी महाराष्ट्र लुटून सुरतला देत आहेत अशी टीका देखील नाना पटोले यांनी केली.

हेही वाचा:

  1. MLA Disqualification Hearing : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी उद्या - राहुल नार्वेकर
  2. Sharad Pawar : जनतेच्या प्रश्नांसाठी प्रसंगी केसेस अंगावर घ्या, शरद पवारांचा सल्ला, म्हणाले रास्त प्रश्नासाठी रस्त्यावर येणं आपला हक्क
  3. Sanjay Raut News : उडता पंजाबप्रमाणे उडता महाराष्ट्र करायचा प्लॅन आहे का- खासदार संजय राऊत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.