अमरावती : अमरावती पदवीधर मतदासंघासाठी काँगेसचे उमेदवार अद्यापही निश्चित झाले नाहीत. आतापर्यंत डॉ. सुनिल देशमुख, डॉ. सुधीर ढोणे, मिलिंद चिमोटे, श्याम प्रजापती, डॉ. लोढा, भैया मेटकर या सहा उमेदवाराची नावे आमच्यापर्यंत आले असल्याची माहिती पटोले यांनी दिली. निवड केलेला उमेदवार हा महाविकास आघाडीचा असेल. ( Congress Party State President Nana Patole ) आमच्याकडून निवडणुकीची सगळी तयारी झाली असून मविआचा उमेदवार निवडून येईल, असा विश्र्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. येता 12 तारखेला आम्ही उमेदवार जाहीर करणार असून तेव्हाच फॉर्म भरण्याकरता मी स्वतः येथे येणार असल्याचे त्यांनी सांगितले. वंचित बहुजन आघाडी सोबत युती करणार का ? या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, वंचित बहुजन आघाडीचा प्रस्ताव आमच्यापर्यंत आला किंवा आम्ही त्यांना प्रस्ताव दिला. त्यामुळे अजून पर्यंत काहीच ठरले नसल्याचे सांगितले. ( teachers graduates of legislative council )
सहा संभाव्य उमेदवारांची नावे : अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ( District Central Bank ) सभागृहात अमरावती विभागाची विभागीय बैठक (Departmental meeting of Amravati Division ) आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला बलवंत वानखडे, बबलू देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, माजी मंत्री सुनील देशमुख, भैय्यासाहेब मेटकर, श्याम प्रजापती मिलिंद चीमोटे, दिलीप एडतकर यांच्यासह अमरावती विभागातील अमरावती, यवतमाळ अकोला, वाशिम, बुलढाणा यासह अमरावती जिल्हा शहर व ग्रामीण काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
काय असते पदवीधर मतदार संघ निवडणूक ? महाराष्ट्राच्या विविध भागातील पदवीधर त्या त्या भागातून त्यांचा प्रतिनिधी आमदार निवडून देतात. पदवीधर मतदार संघ असतो ही गोष्ट खेडेगावातील मतदारांना जास्त प्रमाणात प्रचलित नाही,याचा प्रसार करणे ही एक महत्त्वाची व काळाची गरज आहे. प्रत्येक जिल्ह्याला पदवीधर मतदारसंघ असतो. त्या मतदारसंघातून पदवीधारक निवडणुकीसाठी पात्र असतो.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची चाचपणी : नाना म्हणाले, विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची चाचपणी करण्यासाठीच मी येथे आलो होतो. त्यानुसार अमरावती विभागातील अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशीम व यवतमाळ या पाचही जिल्ह्यांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी मी येथे चर्चा केली. त्यातून जी नावे पुढे आलीत, त्याची संख्या तुमच्यासमोर ठेवली आहे. ती नावे नेमकी कोणती, असे विचारले असता अमरावतीतून माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख, माजी महापौर मिलींद चिमोटे, काँग्रेसचे जिल्हा पदाधिकारी भय्यासाहेब मेटकर व मीडिया सेलचे प्रभारी श्याम प्रजापती तर अकोल्यातून डॉ. सुधीर ढोणे आणि डॉ. लोढा ही ती नावे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पदवीधरांचा नोकरीच्या बाबतीत झालेला भ्रमनिरास, राज्यात सुरू असलेले दहशतवाद व भीतीचे वातावरण, महागाई आदी मुद्यांवर ही निवडणूक लढली जाईल, असेही पटोले यांनी यावेळी स्पष्ट केले.