ETV Bharat / state

Amravati News : जीएसटी कर संकलनाची पद्धत सोपी करण्याचा सरकारचा मानस - अभय कुमार

अमरावतीत विदर्भ टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आणि अनेक कंपन्यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उद्योजकांसाठी जीएसटी कर संकलनाची पद्धत सोपी करण्याचा सरकारचा मानस असल्याचे यावेळी नागपूरचे कमिशनर अभय कुमार यांनी सांगितले.

GST tax collection method
जीएसटी कर संकलनाची पद्धत सोपी
author img

By

Published : Jan 21, 2023, 11:51 AM IST

अमरावती : देशाच्या विकासामध्ये आणि अर्थव्यवस्थेमध्ये एकूणच उद्योजकांची भूमिका खूप मोठी आणि महत्त्वाची आहे. त्यामुळेच उद्योजकांना नेहमीच सरकारकडून झूकते माप दिले जाते. परंतू या उद्योगांमध्ये सुसूत्रता यावी यासाठी प्रशासनाच्यावतीने जीएसटी ही कर संकलनाची पद्धत अधिक सोप्या पद्धतीने राबवण्याचे काम सरकार करत आहे. यामधल्या असलेल्या त्रुटी लवकरच भरून काढण्यात येण्यार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय उत्पादन शुल्क नागपूरचे कमिशनर अभय कुमार यांनी केले.

जीएसटी ही कर संकलन प्रणाली : व्हॅटनंतर २०१७ मध्ये आलेली जीएसटी ही कर संकलन प्रणाली आपल्या सर्वांसाठी नवीनच होती. परंतू यामध्ये सनदी लेखापाल यांची भूमिका खूप महत्त्वाची ठरली आहे. सध्या लेखापाल हा शासन व उद्योजक यांच्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावतो. सरकारी आदेशापेक्षाही व्यवसायिकांना सीए अधिक जवळचे वाटतात. त्यामुळेच आर्थिक घडामोडी संदर्भात व्यापारी सनदी लेखापालकडे अधिक व्यक्त होतात. सनदी लेखापाल हा व्यापार आणि सरकार यांच्या मधला दुवा असल्याचे अभय कुमार यांनी यावेळी सांगितले.

सनदी लेखापाल व्यापारी सरकारमधील दुवा : केंद्रीय उत्पादन शुल्क, विभाग अमरावतीचे सहाय्यक आयुक्त, CGST श्री. नावेद ए. शेख म्हणाले की, सनदी लेखा पाल हे व्यापाऱ्यांसाठी आणि व्यवसायासाठी ईश्वरापेक्षा कमी नाहीत. ते प्रत्येक क्षणी व्यापारी लोकांची मदत करतात. त्यांच्या अडीचणीत मदत करतात. सनदी लेखापाल हे व्यापारी आणि प्रशासन यांच्यामध्ये हातात हात घालून काम करण्याची तयारी ठेवतात असे सुद्धा त्यांनी यावेळी सांगितले. चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया ICAI च्या WIRC ची अमरावती शाखा आणि केंद्रीय वस्तू व सेवा कर विभाग अमरावती, टॅक्स बार असोसिएशन विभाग अमरावती, विदर्भ टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन विभाग नागपूर, अमरावती चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

इन्कम टॅक्स फाईल करताना अडचणी : इन्कम टॅक्स फाईल करताना तसेच मासिक आणि त्रेमासिक विवरण भरताना व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. त्यावर कुठल्याच प्रकारचे सोल्युशन्स वेळेवर मिळत नसल्याची तक्रार सनदी लेखापाल यांनी यावेळी केली. त्यावर उत्तर देताना अभय कुमार असे म्हणाले की, व्हॅट जाऊन जीएसटी येणार असल्याबाबतच्या सूचना वेळोवेळी केंद्र सरकारकडून देण्यात आल्या होत्या. त्याविषयी खूप सारे सेमिनार सुद्धा घेण्यात आले होते. त्यामुळे जीएसटी हा विषय आता नवीन नसून जुना झाले आहे, अशी माहीती कमिशनर अभय कुमार यांनी यावेळी दिली. केंद्र सरकारच्यावतीने भरपूर मोठ्या प्रमाणात सेमिनार घेण्यात आले. तशी सूचना सुद्धा व्यापाऱ्यांना देण्यात आली होती. यासोबतच सनदी लेखापालना सुद्धा याविषयी अवगत करण्यात आले.

हेही वाचा : Wrestlers Protest : क्रीडामंत्र्यांच्या आश्वासनानंतर अखेर आंदोलन मागे! आरोपांची समितीकडून होणार चौकशी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.