अमरावती : भातकुली नगर पंचायतच्या मुख्याधिकारी श्रीमती करिष्मा वैद्य ( Nagar Panchayat Chief Officer Karishma Vaidya ) यांना लाच स्वीकारताना पकडले आहे. गारमेंट व्यवसाय आणि शिलाई प्रशिक्षण सुरू करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्याकरिता २० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या भातकुली नगर पंचायतच्या मुख्याधिकारी श्रीमती करिष्मा वैद्य ( Caught Red Handed Taking Bribe ) यांना लाच स्वीकारताना आज त्यांच्या राहत्या घरी रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.
ना हरकत प्रमाणपत्रासाठी मागीतली लाच : उपलब्ध माहिती नुसार, या प्रकरणातील तक्रारदार यांना भातकुली येथे शिलाई प्रशिक्षण आणि गारमेंट्स व्यवसाय टाकायचा होता. त्यासाठी त्यांना नगर पंचायत चे नाहरकत प्रमाणपत्र पाहिजे होते. त्याकरिता त्यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे नाहरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज केला असता. प्रमाणपत्र देण्यासाठी संबंधिताला 50 हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदार यांच्या तक्रारी नंतर 2 नोव्हेंबर रोजी पडताळणी केली असता तडजोडीअंती 20 हजार रुपये लाचेची मागणी करण्यात आली ( Twenty Thousand Rupees Bribe ) होती.
पोलिसांकडून कारवाई : सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मारुती जगताप, अमरावती परिक्षेत्र अमरावती, मा. अप्पर पोलीस अधीक्षक, अरुण सावंत, पोलीस उपअधीक्षक संजय महाजन, शिवलाल भगत यांच्या मार्गदर्शनात पो.नि. प्रवीण पाटील यांनी केली.या कारवाईत प्रविण पाटील पोलीस निरीक्षक,केतन मांजरे पोलिस निरीक्षक यांनी सहभाग नोंदवला होता.