अमरावती - दोन कुटुंबातील संपत्तीच्या वादातून चुलत भावनेच आपल्या भावाची निर्दयी हत्या केल्याची घटना अमरावती जिल्ह्यातील परतवाडा शहरातील मुगलाईपुरा परिसरात घडली. आकाश कंगाले असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून, आरोपी सागर कंगाले हा फरार झाला आहे. परतवाडा पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आहेत
हेही वाचा - मुलाला हळद लागली...अन्ं पित्याने संपवले जीवन
परतवाडा येथे राहणारा आरोपी सागर कंगाले व हत्या झालेला आकाश कंगाले हे दोघेही चुलत भाऊ आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही कुटुंबात संपत्तीचा वाद सुरू असल्याची माहिती आहे. अशातच मृत आकाश हा त्याच्या घरी जेवण करत असताना. अचानक आरोपी सागर कंगाले हा त्याच्या घरात शिरला व त्याच्या पाठीवर धारदार शस्त्राने वार करुन त्याची हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी सागर कंगाले सह अन्य दोन आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा शोध सध्या सुरू आहे.
हेही वाचा - शिवनेरीवर आढळला शिवभक्ताचा मृतदेह, शिवजन्मोत्सवावेळी दूर्घटना घडल्याची शक्यता