ETV Bharat / state

पोळ्याच्या दिवशीच अमरावतीत एकाची हत्या; दोघे गंभीर जखमी - अमरावती बातमी

डांगरीपूरा परिसरातील मेश्राम परिवाराचे अनेक फ्रूटचे दुकान आहेत. येथे आरोपी मंगेश कावरेचेही एक फ्रूटचे दुकान आहे. त्यामुळे मेश्राम परिवाराचा व्यवसाय जास्त होतो. मंगेश कावरे याचा व्यवसाय मंदीत चालतो. यामुळे आरोपी मेश्राम परिवाराला शिवीगाळ करत होता.

अमरावतीत एकाचा मर्डर
author img

By

Published : Aug 31, 2019, 4:48 PM IST

अमरावती- जिल्ह्यात बैल पोळ्याच्या दिवशीच शुक्रवारी दोन कुटूंबात भांडण झाले. यात एकाचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना डांगरीपुरा परिसरात घडली आहे. घटनेचे गांभीर्य पाहता शहरात दंगा नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले. फ्रूट व्यवसायाच्या जुन्या वादातून ही घटना घडली.

पोळ्याच्या दिवशीच एकाचा मर्डर
डांगरीपूरा परिसरातील मेश्राम परिवाराचे अनेक फ्रूटचे दुकान आहेत. येथे आरोपी मंगेश कावरेचेही एक फ्रूटचे दुकान आहे. त्यामुळे मेश्राम परिवाराचा व्यवसाय जास्त होतो. मंगेश कावरे याचा व्यवसाय मंदीत चालतो. यामुळे आरोपी मेश्राम परिवाराला शिवीगाळ करत होता. अशातच शुक्रवारी रात्री मृतक ऋषीकेश प्रकाश मेश्राम (२२), जखमी ललीत मोतीराम मेश्राम (३०) यांच्यासोबत आरोपी मंगेश कावरे यांची बाचाबाची झाली. याच कारणावरुन फिर्यादीचा भाऊ ललित मोतीराम मेश्राम याला मंगेश कावरेने शुक्रवारी शिवीगाळ केली. तुला ठार मारतो अशी धमकी दिली. मंगेशने त्याच्या खिशातून चाकू काढला व ललीतच्या उजव्या मांडीवर वार केला. तेव्हा ऋषिकेश मेश्राम हा ललितला सोडविण्यासाठी आल्याने मंगेश कावरे याने ऋषिकेश मेश्रामच्या छातीवर, पोटावर चाकूने वार केले.

त्यानंतर ऋषिकेश व ललित मेश्राम यांना चांदूर रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे डॉक्टरांनी ऋषिकेशला मृत घोषित केले. ललित मेश्राम गंभीर जखमी असल्यामुळे त्याला पुढील उपचाराकरिता अमरावती इर्विन येथे पाठविण्यात आले. यानंतरही हे प्रकरण थांबले नाही. त्यानंतर खुनाचा आरोपी मंगेश याचे वडील प्रकाश गोविंदराव कावरे (५५) यांच्यावर काही जनांनी हल्ला केला. यात कावरे यांच्या डोक्याला मार लागला असून त्यांना चांदूर रेल्वे ग्रामीण रुग्णालयातून अमरावती येथे रेफर करण्यात आले.

Intro:पोळ्याच्या दिवशीच अमरावतीच्या चांदूर रेल्वेत एकाचा मर्डर
दोघे गंभीर

अमरावती अँकर

    अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरातील डांगरीपुरा परिसरात पोळ्याच्या दिवशी शुक्रवारी रात्री ८.३० वाजता दोन परिवारात झालेल्या भांडणामध्ये एकाचा मृत्यु झाला असुन दोघे गंभीर झाल्याची घटना घडली आहे. घटनेचे गांभीर्य पाहता शहरात दंगा नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले. फ्रुट व्यवसायाच्या जुन्या वादातुन ही घटना घडली.

डांगरीपुरा परिसरातील मेश्राम परिवाराचे अनेक फ्रुटचे दुकान आहेत व आरोपी मंगेश कावरे चे एकच फ्रुटचे दुकान आहे. त्यामुळे मेश्राम परिवाराचा धंदा जास्त होतो व मंगेश कावरे याचा धंदा कमी होतो म्हणून तो नेहमी मेश्राम परिवाराला शिवीगाळ करत होता. अशातच शुक्रवारी रात्री मृतक ऋषीकेश प्रकाश मेश्राम (२२), जखमी ललीत मोतीराम मेश्राम (३०) रा. डांगरीपुरा यांच्यासोबत डांगरीपुरा येथील आरोपी मंगेश कावरे सदस्याची बाचाबाची झाली. याच कारणावरून फिर्यादीचा भाऊ ललित मोतीराम मेश्राम याला मंगेश कावरेने शुक्रवारी शिवीगाळ केली व तुला आता ठार मारतो असे म्हणून मंगेशने त्याच्या खिशातून चाकू काढला व ललीतच्या उजव्या मांडीवर वार केला. तेव्हा चुलत भाऊ ऋषिकेश मेश्राम हा ललित सोडविण्याकरिता आल्याने मंगेश कावरे याने ऋषिकेश मेश्रामच्या छातीवर, पोटावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. तो तिथून पळून गेला. त्यानंतर ऋषिकेश व ललित मेश्राम यांना मोटरसायकलने चांदूर रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले असता तेथे डॉक्टरांनी ऋषिकेशला मृत घोषित केले व ललित मेश्राम गंभीर जखमी असल्यामुळे त्याला पुढील उपचाराकरिता अमरावती इर्विन येथे पाठविण्यात आले. यानंतर हे प्रकरण थांबले नाही व काही आरोपींनी खुनाचा आरोपी मंगेश याचे वडील प्रकाश गोविंदराव कावरे (५५) यांच्यावर हल्ला चढवुन त्यांना मारहाण केली आहे. यामध्ये कावरे यांच्या डोक्याला मार लागला असुन त्यांना चांदूर रेल्वे ग्रामिण रूग्णालयातुन अमरावती येथे रेफर करण्यात आले. Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.