अमरावती- महावितरणात सेवा बजावताना मृत्यू, तसेच वैद्यकीय कारणास्तव मुदतपूर्व सेवानिवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसाला अद्यापपर्यंत नोकरीत सामावून घेण्यात आले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वारसांनी मुख्य अभियंता परिमंडळाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
हेही वाचा- चलनाचे अवमूल्यन! डॉलरच्या तुलनेत २६ पैशांच्या घसरणीनंतर रुपया ७१.८० वर
महावितरणाच्या सेवेत असताना ज्यांचा मृत्यू झाला, वैद्यकीय कारणास्तव मुदतपूर्व सेवानिवृत्ती घेतली. अशा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सुशिक्षित व्यक्ती दहा ते बारा वर्षांपासून नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांच्याकडे कोणतेही उत्पन्नाचे साधन नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना लवकर अनुकंपामध्ये सामावून घ्यावे यासाठी हे उपोषण सुरू आहे.