ETV Bharat / state

'मातोश्री'वर धडक देण्याच्या तयारीत असलेल्या राणा दाम्पत्याला अटक; अमरावतीत खळबळ - अमरावतीत राणा दाम्पत्याला अटक

शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणाऱ्या आमदाराला कारागृहात डांबण्यात येत आहे. सरकारचे डोके अजिबात ठिकाणावर नाही. आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटायला निघालो असताना आम्हाला अटक करायला लावणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आमची भीती का वाटते? असा प्रश्न खासदार नवनीत राणा यांनी विचारला आहे.

अमरावतीत खळबळ
अमरावतीत खळबळ
author img

By

Published : Nov 15, 2020, 8:13 PM IST

Updated : Nov 15, 2020, 8:42 PM IST

अमरावती - शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलन केल्यानंतर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा मुख्यमंत्र्यांना भेटायला मुंबईला निघणार असताना त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकाराने अमरावतीत खळबळ उडाली आहे.

मुख्यमंत्र्यांना आमची भीती वाटते का?

शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणाऱ्या आमदाराला कारागृहात डांबण्यात येत आहे. सरकारचे डोके अजिबात ठिकाणावर नाही. आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटायला निघालो असताना आम्हाला अटक करायला लावणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आमची भीती का वाटते? असा प्रश्न खासदार नवनीत राणा यांनी विचारला आहे. मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नी निवेदन देणार म्हणून खासदार आणि आमदाराला अटक करणे हा कुठला कायदा आहे. हा विषय मी लोकसभेत मांडणार, असेही नवनीत राणा म्हणाल्या. मुंबईला जायला घरातून निघत असताना पोलिसांनी आम्हाला अटक का केली? या विषयावर राणा दाम्पत्य पोलीस आयुक्तांशी चर्चा करत आहे. राणा दाम्पत्याला अटक केली असल्याने कार्यकर्त्यांनी बडनेरा रेल्वे स्थानकावर विदर्भ एक्सप्रेस रोखून धरली आहे.

काय आहे प्रकरण

बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी सरसकट ५० हजार रुपयांची मदत द्यावी, चार महिन्यांचे वीज बिल माफ करण्यात यावे, यासह शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आमदार रवी राणा व युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्याकर्त्यांनी शुक्रवारी अमरावती-नागपूर महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले होते. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. त्यानंतर आमदार रवी राणा यांना कार्यकर्त्यांसह अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली. उद्या राणा दाम्पत्य मुंबईत 'मातोश्री'वर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भेटणार होते. मुंबईला जाण्याच्या तयारीत असताना दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

'मातोश्री'वर धडक देण्याच्या तयारीत असलेल्या राणा दाम्पत्याला अटक

Last Updated : Nov 15, 2020, 8:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.