ETV Bharat / state

Anil Bonde: भुयारी गटार योजनेसाठी सक्तीने भूसंपादन करा, खासदार अनिल बोंडे यांचे आदेश - महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

शहरात कित्येक वर्षांपासून रखडलेल्या भुयारी गटार योजनेच्या (under ground sewerage scheme) संयुक्त मल वाहिनीच्या २ पंपिंग स्टेशन करता सक्तीने भूसंपादनाची व पंपिंग स्टेशनच्या कामाची कार्यवाही सुरु करावी, असे निर्देश खासदार डॉ. अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. (Maharashtra Life Authority).

अनिल बोंडे
Anil Bonde
author img

By

Published : Nov 9, 2022, 6:47 PM IST

अमरावती: शहरात कित्येक वर्षांपासून रखडलेल्या भुयारी गटार योजनेच्या (under ground sewerage scheme) संयुक्त मल वाहिनीच्या २ पंपिंग स्टेशन करता सक्तीने भूसंपादनाची व पंपिंग स्टेशनच्या कामाची कार्यवाही सुरु करावी, असे निर्देश खासदार डॉ. अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रत्येक घरापर्यंत नळाने पाणीपुरवठा करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा आढावा बोंडे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (Maharashtra Life Authority) व जिल्हा परिषद पाणीपुरवठा अभियंता यांच्याकडून बैठकीत घेतला याप्रसंगी त्यानी उपरोक्त सुचना केली.

भुयारी गटार योजना व अमृत-२ चा आढावा: अमरावती भुयारी गटार योजना अतिशय संथ गतीने वाटचाल करत आहे. १ कोटी रुपयांच्या या योजनेची गती वाढावी, यासाठी खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी आढावा घेत योजनेतील अडथळे दूर करण्याच्या दृष्टीने सूचना दिल्या. झोन क्र. ४ व ५ मध्ये २४६४६ प्रॉपर्टी कनेक्शन करणे अपेक्षित होते. परंतु सद्यस्थितीत ८६०० कनेक्शनचे फार्म करण्यात आले आहे. झोन क्र. २ व ३ करिता गाडगेनगर ते लालखडी मलगुद्धी केंद्रापर्यंत मुख्य माहि टाकणे अपेक्षित होते. परंतु गुरुत्वाकर्षण शक्तीने वरील बाब शक्य नसल्याने २ पपिंग स्टेशन प्रस्तावित करून संयुक्त मलवाहिनीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात यावा व वौल शांत्रिक बदल तातडीने मंजूर करून भुयारी गटर योजनेच्या कामरा, असे निर्देश बोंडे यांनी अधिकाऱ्यांना दिले.

जलजीवन कार्यशाळा घेण्यात यावी: जिल्ह्यात मजिप्राच्या माध्यमातून ११०० कोटी रुपयांची २२ कामे व जिल्हा परिषदच्या माध्यमातून १६० गावातील २२० कोटी रुपयांची कामे मंजूर झालेली आहेत. या सर्व कामाचे भूमिपूजन अमरावती येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात यावे व पाणीपुरवठ्याचे महत्व विषद करण्याकरिता सर्व ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांची जलजीवन कार्यशाळा घेण्यात यावी, अशी सूचना भाजप नेते अनिल बोंडे यांनी अधिकान्यांना केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.