ETV Bharat / state

Melghat Malnutrition : अखेर 'त्या' मातेने अंधश्रद्धेला फाटा देत पोटच्या गोळ्याला दिले जीवनदान - Mother broke superstition

जन्मजात बाळाचे वजन वाढावे (Birth weight of baby should increase) यासाठी एका मातेने सासरच्या मंडळीचा विरोध झुगारून तसेच गावठी उपचार नाकारून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करून बाळाच्या वजनात वाढ करण्यात आली आहे. ( Melghat is notorious for malnutrition )

Melghat Malnutrition
मातेने अंधश्रद्धेला फाटा देत पोटच्या गोळ्याला दिले जीवनदान
author img

By

Published : Nov 6, 2022, 9:06 AM IST

Updated : Nov 6, 2022, 9:31 AM IST

अमरावती : मेळघाटात आजही जुन्या परंपरा, रूढी, अंधश्रद्धा आदिवासींच्या मनात खोलवर रुजलेल्या आहेत. मात्र काही आदिवासी महिला या जुन्या परंपरा, रूढया, अंधश्रद्धायावर मात करत पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. याचाच प्रत्यय मेळघाटातील मनभंग गावात दिसून आला. जन्मजात बाळाचे वजन वाढावे (Birth weight of baby should increase) यासाठी एका मातेने सासरच्या मंडळीचा विरोध झुगारून तसेच गावठी उपचार नाकारून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करून बाळाच्या वजनात वाढ करण्यात आली आहे.

मेळघाट आहे कुपोषणासाठी कुप्रसिद्ध : मेळघाटात मोठ्या प्रमाणात कुपोषित बालके जन्माला येतात. बालकांचे जन्मजात वजन खूप कमी असते. अशा बाळांचे वजन अतिशय कमी झाल्यास कुपोषणग्रस्त होऊन बालके मृत्यूमुखी पडतात. कुपोषणाचे प्रमाण थांबावे यासाठी आरोग्य प्रशासन मोठ्या प्रमाणात खर्च करून यंत्रणा राबवण्यात येते. तरीही मेळघाटमध्ये कुपोषण वाढताना दिसत आहे. अशा स्थितीत लहान बालकांना वाचण्याची आरोग्य यंत्रणेला मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागते. यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे आदिवासीना औषधोपचार करण्याकरिता त्यांचे मन वळवणे. बऱ्याचदा स्थानिक भूमका म्हणजे वैद्य यांच्याकडून पोटावर गरम चटके किंवा अघोरी उपाय करण्यात येतात.

लतावर होतो आहे अभिनंदनाचा वर्षाव : स्वतःच्या पोटचा गोळा मरणाच्या दाढेत उभा असतांना त्याला वाचविण्यासाठी आपल्या घरच्यांच्या विरोधात जाऊन बाराशे ग्रामच्या बालकाला जीवनदान देण्यात मातेला यश मिळाले आहे. सध्या याबालकाचे वजन दोन किलो सहाशे ग्राम झाले आहे. मेळघाटच्या चिखलदरा तालुक्यातील मनभंग गावात लता अविनाश दहीकर ही महिला पहिल्यांदा गर्भवती राहिली. गर्भवती राहिल्या पासून आरोग्य विभागाच्यावतीने सर्व सेवा देण्यात आल्या. मात्र याच दरम्यान सातव्या महिन्यातच प्रसूतकळा सुरू झाल्या.

आरोग्य यंत्रणेने केले शर्थीचे प्रयत्न : त्यामुळे गावातील आशा सेविकेने मोथा उपकेंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ नीता नागले यांना फोन केला. मात्र रुग्णवाहिका पोहचेपर्यंत घरीच प्रसूती झाली. मात्र जन्माला आलेले बाळ हे कमी दिवसाचे असल्याने त्याचे वजन हे चौदाशे ग्रामच होते. त्यामुळे आई व बाळाला उपचारासाठी अचलपूर च्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारा साठी दाखल करण्यात आले. मात्र येथील डॉक्टरांनी सुद्धा अमरावती येथील डफरिन रुग्णालयात रेफर केले. त्याठिकाणी बाळ व आई तब्बल वीस दिवस भर्ती होते. मात्र काही करून बाळाच्या वजनात वाढ झाली नाही. उलट दोनशे ग्रामने बालकाचे वजन कमी झाले. त्यामुळे दहिकर कुटुंब बाळाला घेऊन घरी आले इकडे आरोग्य विभागाचे कर्मचारी एक बालमृत्यू होईल म्हणून विचारात पडले होते. त्यामुळे आरोग्य कर्मचारी तथा अंगणवाडी सेविकेने पुन्हा एकदा बाळाचे वजन वाढविण्या साठी प्रयत्न करून पाहू म्हणून परतवाडा शहरातील खाजगी बालरोग तज्ज्ञ डॉ श्रीकृष्ण घुटे यांना दाखविण्यासाठी घेऊन गेले. बाळाला तपासल्या नंतर डॉक्टरांनी भर्ती करण्याचा सल्ला दिला. मात्र घरचे भर्ती करण्यास तयार नव्हते, अखेर डॉक्टरांनी औषधी लिहून काही टिप्स दिल्या त्या टिप्स आणि औषध वेळोवेळी घेण्याचा सल्ला दिला.

आईच्या प्रयत्नाला आले यश : मात्र लताच्या घरचे कुटुंब अंधश्रद्धा, रूढी, परंपरा मानणारे असल्याने तिला मानसिक त्रास होऊ लागला. अखेर तिने स्वतःच्या पोटच्या गोळ्याला मरणाच्या दाढेतून बाहेर काढण्यासाठी जुन्या परंपरा, रुढ्या, अंधश्रद्धा झुगारून बाळाला घेऊन माहेरी निघून गेली व त्याठिकाणी डॉक्टरांच्या सल्ल्या नुसार व वेळेवर औषधी घेत त्या बाळाचे वजन वाढविण्यात आईला यश मिळाले. सध्या त्या बाळाचे आताचे वजन दोन किलो सहाशे ग्राम झाले आहेत. जुन्या परंपरा, रुढ्या,अंधश्रद्धा झुगारून मेळघाट सारख्या एका छोट्याशा गावात आपल्या पोटच्या गोळ्याला जीवनदान देण्यात आईला यश मिळवले आहे. यासाठी आरोग्य विभागा च्या मोथा उपकेंद्रा च्या वैद्यकीय अधिकारी डॉ नीता नागले, डॉ ढोके, आरोग्य सेविका हिना सौदागर, प्रविणा धाकडे, अंगणवाडी सेविका शांता पाटणकर, आशा सेविका चंद्रकला आदींनी परिश्रम घेतले.

Last Updated : Nov 6, 2022, 9:31 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.