अमरावती Morshi Murder Case: मोर्शी शहरात शुक्रवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास शिवाजीनगर परिसरातील एका घरात बेडच्या बॉक्समध्ये आई आणि मुलाचा मृतदेह आढळून आला. (son absconded after killing his mother) सुमारे चार ते पाच दिवसांपासून हे दोन्ही मृतदेह कुजले असल्यामुळे त्याचा दुर्गंध पसरला होता. या प्रकरणात शनिवारी मृत महिलेच्या मोठ्या मुलानेच आईसह लहान भावाला मारून घरात पलंगामध्ये असणाऱ्या बॉक्समध्ये लपवून ठेवले असल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात उघड झाला आहे. (Mother and Brother murder)
असे आहे संपूर्ण प्रकरण: नीलिमा गणेश कापसे (45) आणि आयुष गणेश कापसे (22) अशी मृतकांची नावे आहेत. नीलिमा कापसे या पतीच्या निधनानंतर मुलगा आयुष आणि सौरभ याच्यासह मोर्शी येथील शिवाजीनगर परिसरात राहत होत्या. त्या वनविभाग रोजंदारी मजूर म्हणून काम करीत होत्या. त्यांची कोंडाळी येथे राहत असलेली आई गोदाबाई बेलगे (75) त्यांच्यासोबत रोज मोबाईल फोनवरून संपर्क साधून बोलत होत्या. मात्र गत पाच दिवसांपासून मुलगी आणि नातू हे मोबाईल फोन उचलत नसल्यामुळे त्यांना संशय आला आणि त्या थेट कोंढाळी येथून मोर्शी येथे पोहोचल्या. दरम्यान नीलिमा कापसे यांच्या घराचे समोरचे दार आतमधून बंद होते तर मागचे दार उघडे असल्याचे त्यांच्या आई आणि शेजाऱ्यांना दिसले.
आरोपी सौरभ गुन्हेगारी वृत्तीचा: नीलिमा कापसे यांच्या घरातून दुर्गंध देखील येत होता. याबाबत पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांनी कापसे यांच्या घरात प्रवेश केला असता त्यांना घरातील बेडला असलेल्या बॉक्समधून दुर्गंध येत असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी बेडचा बॉक्स उघडला असता त्यामध्ये नीलिमा आणि त्यांचा मुलगा आयुष यांचा कुजलेला अवस्थेतील मृतदेह आढळून आला. मुलीचा आणि नातवाचा मृतदेह पाहून गोदाबाई बेलगे यांना मोठा धक्का बसला आणि त्यांनी मुलीचा आणि नातवाचा खून हा माझा मोठा नातू सौरभ कापसे यांनीच केला असावा असे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी सौरभ बाबत चौकशी केली असता तो फरार असल्याचे पोलिसांना लक्षात आले. सौरभ हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीवर चाकूने हल्ला केल्याच्या प्रकरणात त्याच्याविरुद्ध चांदूरबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल असल्याचे समोर आले.
दोन्ही मृतदेह होते कुजलेले: नीलिमा कापसे आणि त्यांचा मुलगा आयुष कापसे या दोघांचेही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळून आले होते. शनिवारी या दोन्ही मृतदेहांवर वर्षी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यावर ते त्यांच्या नातेवाईकांना सोपविण्यात आले होते. मृतदेहांवर शनिवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान आई आणि भावाची हत्या करून फरार असणारा सौरभ कापसे याचा पोलीस शोध घेत आहेत.
हेही वाचा: