ETV Bharat / state

'कृषी कायदे रद्द करण्यासाठी मोदींचा हेकेखोरपणा आडवा आला'

author img

By

Published : Jan 25, 2021, 9:22 AM IST

Updated : Jan 25, 2021, 3:33 PM IST

अपेक्षा होती की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करतील. पण तसे झाले नाही कारण पंतप्रधान मोदींचा हेकेखोरपणा आडवा आला, अशी जहरी टीका राज्यमंत्री बच्चू कडू यांनी कृषी कायद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे.

राज्यमंत्री बच्चू कडूंची पंतप्रधानांवर टीका

अमरावती - मागील 55 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर पंजाब, हरियाणातील शेतकऱ्यांचे शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू आहे. मागील 55 दिवसांपासून त्यांनी हे आंदोलन सुरू केले आहे. आता अपेक्षा होती की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करतील. पण तसे झाले नाही कारण पंतप्रधान मोदींचा हेकेखोरपणा आडवा आला आहे, अशी जहरी टीका राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे.

कृषी कायदे रद्द करण्यासाठी मोदींचा हेकेखोरपणा आडवा आला

प्रजासत्ताक दिनी मागण्या पूर्ण कराव्या

कृषी कायदे रद्द करण्यासाठी राज्या राज्यात शेतकऱ्यांचे आंदोलन पेटले आहे. खरे तर प्रजासत्ताक देशात प्रजा ही राजा असली पाहिजे. मग देशाचे पंतप्रधान असो की राज्याचे मुख्यमंत्री, आमदार, खासदार हे त्याचे सेवक असले पाहिजे. मात्र मोदींचे सरकार हे विसरले आहे की प्रजा राजा आहे आणि आपण सेवक आहे. परंतु आता प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून आम्हाला अपेक्षा आहे की शेतकरी राजाने कृषी कायद्या संदर्भात केलेल्या मागण्या पूर्ण कराव्या, अन्यथा देशभरात उग्र आंदोलन झाल्याशिवाय राहणार नाही, असेही राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले.

राज्यपालांच्या घराला सर्वपक्षीय नेते घालणार घेराव

मुंबईत राज्यपाल यांच्या घराला सर्वपक्षीय नेते घेराव घालणार आहेत. ही आनंदाची बाब आहे, असे प्रथमच होत आहे. त्यामुळे शेतकरी राजाचा विजय झाला आहे. आता राज्यपाल यांनीही राष्ट्रपती यांना कळवून हे कायदे रद्द करावे, अशी मागणीही राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली आहे.

हेही वाचा - शेतकऱ्यांचे 'लाल वादळ' मुंबईत धडकले!

Last Updated : Jan 25, 2021, 3:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.