अमरावती MLA Yashomati Thakur News : 2019 च्या लोकसभा निवडणुकीत यशोमती ठाकुर यांनी राणा यांच्याकडून कडक नोटा घेऊन विरोधकांचा प्रचार केलाय, असा आरोप राणा दाम्पत्यानं केलाय. त्यांनी हा आरोप सिद्ध करावा. अन्यथा त्यांच्या विरोधात आपण 100 कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचा इशारा आमदार यशोमती ठाकुर यांनी या आरोपाला प्रत्युत्तर देताना प्रसारमाध्यमाशी बोलताना दिलाय. निवडणुकीत कडक नोटा वाटल्या गेल्या, तेव्हा निवडणूक आयोग झोपले होते का? असा सवाल उपस्थित करत या प्रकारची निवडणूक आयोगाकडेदेखील तक्रार करणार असं आमदार यशोमती ठाकुर यांनी म्हटलंय. (defamation claim against Navneet Rana Ravi Rana)
राणांना नेमकं कोणाचा आशिर्वाद : ही अतिशय घाणेरंडी माणसं आहेत. त्यांनी जात चोरलीय, ही वस्तुस्थिती आहे. हे संपूर्ण जिल्ह्याला माहिती आहे. त्यांनी संपूर्ण जिल्ह्यात घाण पसरवण्याचं काम केलंय. त्यांची लायकी तरी काय आहे? मी लोकसभा निवडणुकीत त्यांच्याकडून कडक नोटा घेतल्या, दुसऱ्याचा प्रचार केला हे त्यांनी सिद्ध करावं. फिल्मी नट-नट्यांना कार्यक्रमात आणायचं. त्यांना नाचवायचं, हेचं उद्योग त्यांनी आजवर केले आहेत. खोटे, बिनबुडाचे आरोप करण्यापूर्वी त्यांची नेमकी जातं कोणती? त्यांचा नेमका पक्ष कोणता? हे त्यांनी जाहीर करावं, असं त्यांनी म्हटलंय.
नेमका आशीर्वाद कुणाचा : कॅमेरापुढं खोटा अभिनय करणाऱ्या व्यक्तीकडून अपेक्षा ठेवणंही गैर आहे, असा उपरोधीक सवाल त्यांनी केलाय. त्या म्हणाल्या की जातं प्रमाणपत्र खरं की खोटं? हा खटला न्यायालयात प्रलंबित असताना व निवडणुकीत जास्त खर्च केल्याचं प्रकरण निवडणूक आयोगाकडे सुरु आहे. त्यांना नेमका आशीर्वाद कुणाचा? आणि भाजपा त्यांना का पाठीशी घालतेय असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केलाय. (Yashomati Thakur vs Navneet Rana Ravi Rana)
- शिल्पा शेट्टीकडं लक्ष अन शेतकऱ्यांकडं दुर्लक्ष : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिल्पा शेट्टी समोर उभं राहायला आले होते. तिचा नवरा राज कुंद्रा याने ब्ल्यू फिल्म बनवल्या. हे त्या शिल्पा शेट्टीसोबत बसतात. शिल्पा शेट्टीला पाहायला येणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांकडे पाहायला वेळ नसल्याची टीकादेखील आमदार यशोमती ठाकूर यांनी केलीय.
आता मतदारसंघात जाऊन आपण खरं बोललो, हा घाव राणा दाम्पत्याच्या जिव्हारी लागलाय. म्हणूनच हा राजकीय पोटशूळ उठला आहे. म्हणूनच ते असे वक्तव्य करत आहेत-आमदार यशोमती ठाकूर
हेही वाचा :
- Rana couple VS Yashomati Thakur: 'तू असशील गोरी आणि मी डोमडी'....पाहा, राणा दाम्पत्य आणि आमदार यशोमती ठाकूरमध्ये रंगलाय कलगीतुरा
- Yashomati Thakur News: भाजपा युवा मोर्चाचा आतताईपणा, फाडले आमदार यशोमती ठाकूर यांचे बॅनर
- Yashomati Thakur Death Threat: तुमचाही दाभोलकर करण्याची ट्विटवरून धमकी, यशोमती ठाकूर म्हणाल्या...