अमरावती : बडनेराचे आमदार रवी राणा पंधरा दिवसानंतर अमरावतीत आले असता त्यांनी शहरातून मिरवणूक काढली. जयस्तंभ चौक येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यावर आमदार रवी राणा यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. त्यांचे संबोधन आटोपताच त्यांना अचानक भोवळ आली आणि ते खाली ( MLA Ravi Rana Fell Down In Amaravati ) कोसळले. यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांनी त्यांना त्वरित त्यांच्या वाहनात बसवून रुग्णालयाकडे ( MLA Ravi Rana Admitted In Hospital ) नेले.
शहरात जल्लोषात स्वागत
अमरावती महापालिका आयुक्तांवर केल्याच्या शाईफेक प्रकरणात ( Amaravati Ink Thrown ) आरोपी असणारे बडनेराचे आमदार रवी राणा पंधरा दिवसानंतर आज अमरावतीत परतले आहेत. त्यांच्या युवा स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ईर्विन चौक येथे त्यांचे जल्लोषात स्वागत केले. इर्विन चौक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यावर आमदार रवी राणा यांनी शहरातून भव्य मिरवणूक काढली आहे. महापालिका आयुक्तांवर शाईफ़ेक केल्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने त्यांना ट्रांजिस्ट बेल दिली आहे. तीन दिवसानंतर आमदार रवी राणा यांना पोलीस अटक करू शकतील असे बोलले जात आहे.
ती तक्रार खोटी
माझ्या विरोधात खोटी तक्रार दाखल करण्यात आली आहे. महापालिका आयुक्तांवर शाईफेक झाली त्या दिवशी मी अमरावतीत नसतानाही माझ्यावर राजकीय दबावाखाली येऊन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. महाविकास आघाडी सरकारमध्ये असणारे अनेक मंत्री हे भ्रष्टाचारी असून, त्यांच्या विरोधात लवकरच कारवाई सत्र राबविले जाणार असल्याचे आमदार रवी राणा यावेळी म्हणाले.