अमरावती - शहरात कोरोनामुळे मोठ्या संख्येत रुग्ण दगावत आहेत. या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी हिंदू स्मशानभूमीची जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे अमरावती शहरापासून 10 किलोमीटर दूर नवी स्मशानभूमी तयार करण्याची मागणी आमदार रवी राणा यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडे केली आहे.
एकाच स्मशानभूमीवर ताण
शहरातील मुख्य 'हिंदू स्मशानभूमी'त मृतदेहांवर अंत्यविधी करण्यासाठी गर्दी होत आहे. हिंदू स्मशानभूमीसह शंकर नगर, विलास नगर आणि संजय गांधी नगर येथील स्मशानभूमीत कोरोनाने दगवलेल्या व्यक्तींच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करता येतील का? याबाबत जिल्हा प्रशासन विचार करीत आहे.
शहरात दहशतीचे वातावरण
कोरोनामुळे दररोज मोठ्या संख्येने रुग्ण दगावत आहे. परिणामी स्मशामभूमीमध्ये २४ तास मृतदेह जळतानाचे चित्र दिसत आहे. या सगळ्याचा परिणाम स्मशानभूमी परीसरात राहणाऱ्या नागरीकांवर होत आहे. त्यामुळे शहरात सध्या दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याचे रवी राणा म्हणाले.