ETV Bharat / state

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना आमदार रवी राणांची जीभ घसरली - रवी राणांची उद्धव ठाकरेंवर टीका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सातत्याने टीका करणारे युवा स्वाभिमानचे आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यावर टीका करताना आज पाळली सोडली. राज्याचे मुख्यमंत्री यांना वारंवार सांगून सुद्धा ते ऐकत नाहीत म्हणत त्यांच्यावर खालच्या पातळीची टीका केली.

MLA Ravi Rana
MLA Ravi Rana
author img

By

Published : Jul 10, 2021, 8:06 PM IST

अमरावती - राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सातत्याने टीका करणारे युवा स्वाभिमानचे आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यावर टीका करताना आज पाळली सोडली. राज्याचे मुख्यमंत्री यांना वारंवार सांगून सुद्धा ते ऐकत नाहीत म्हणत त्यांच्यावर खालच्या पातळीची टीका केली. राणा म्हणाले, की मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान मातोश्रीबाहेर मी बेशरमचे झाड लावणार आहे. राज्य लोकसेवा आयोगाचा विद्यार्थी स्वप्नील लोणकर याच्या आत्महत्येविषयी बोलताना रवी राणांनी ही आक्षेपार्ह टीका फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून केली आहे.

आमदार रवी राणा फेसबुक लाईव्ह
आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा हे सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टिकेची झोड उठवत असतात. अशातच आज आमदार रवी राणा यांनी फेसबुकवर लाईव्ह येऊन राज्यातील प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. आमदार रवी राणा म्हणाले एमपीएससीचा विद्यार्थी स्वप्निल लोणकर याची आत्महत्या तसेच राज्यातील शेतमजूर, शेतकरी यांचे प्रश्न गंभीर आहेत. कोरोनामुळे अनेक लोक मृत्युमुखी पडले आहेत. परंतु याची दखल मुख्यमंत्री घेत नसेल तर मी मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर बेशरमचे झाड लावेन. मराठीत एक म्हण आहे किती सांगितले तर व्यक्ती ऐकत नसेल आणि स्वतःचा उदोउदो करून घेत असेल आणि संपूर्ण महाराष्ट्रामधील जनतेला वाऱ्यावर सोडत असेल तर अशा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर मी बेशरमचे झाड लावणार आहे, अशी टीका रवी राणा यांनी केली.
राज्याच्या पावसाळी अधिवेशनात दरम्यान बारा आमदार निलंबित झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आमदार राणा यांनी विविध मागण्यांसाठी थेट विधानसभा अध्यक्षांना निवेदन दिले. त्यावेळी राणा यांनी माध्यमांसमोर येऊन सर्वसामान्यांचे विविध प्रश्न उपस्थित करून न्याय देण्याची मागणी केली होती. दरम्यान आज एका फेसबुक लाइव्हमध्ये बोलताना आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांना टार्गेट केले. बोलण्याच्या ओघात त्यांनी हे आक्षेपार्ह विधान करून मातोश्री समोर बेशरमचे झाड लावणार असल्याचे जाहीर केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.