अमरावती : आमदार राणा पुढे बोलताना म्हणाले की, मनुष्य कितीही मोठा झाला तरी त्याच्यामध्ये नम्रता असली पाहिजे. अहंकार नसला पाहिजे त्यासोबतच तेवढीच लवचिकता पण असली पाहिजे. उद्धव ठाकरे यांच्यातील नम्रता संपली होती. तसेच अहंकारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. या अहंकाराचा विनाश करण्यासाठीच महाराष्ट्रातील जनतेने त्यांना धडा शिकवला असल्याचे आमदार राणा यांनी म्हटले आहे.
युवकांसाठी भव्य दिव्य रोजगार मेळावा : युवा स्वाभिमान महोत्सव 2023 अंतर्गत भव्य रोजगार मेळावा संपन्न झाला. या रोजगार मेळाव्याचा हजारो युवकांनी लाभ घेतला. युवा स्वाभिमानचे सुरज मिश्रा यांचे यशस्वी आयोजन होते. युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने युवा स्वाभिमान पार्टीच्या स्थापना दिन, राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंती तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या पावन पर्वावर युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने युवकांसाठी भव्य दिव्य रोजगार मेळावा ओसवाल भवन या ठिकाणी ठेवण्यात आलेला होता. त्या ठिकाणी युवकांना रोजगार देण्याच्या दृष्टीने 51 कंपनीचे स्टॉल लावण्यात आले होते. या रोजगार मेळावा ठिकाणी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीच्या निमित्त शहरातील वरिष्ठ पत्रकारांचा सन्मान सोहळा सुद्धा आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये अनेक ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान करून त्यांचा सत्कार करण्यात आला. स्वयंरोजगार मेळाव्यामध्ये शासकीय कार्यालयाचे 22 स्टॉल लागलेले होते.
विविध प्रकारच्या कॅम्पचे आयोजन : त्यामध्ये मुख्यत श्रम कार्ड ,राशन कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड, कामगार कार्ड ,ब्लड डोनेशन कॅम्प, मोफत डोळ्याची तपासणी ,जिल्हा उद्योग कार्यालय अंतर्गत युवकांना युवतींना कर्जाची सुविधा ,मतदान कार्ड, पॅन कार्ड ,ड्रायव्हिंग लायसन, पासपोर्ट शिबिर, दंत तपासणी ,स्वयंरोजगार मेळावा ,इन्शुरन्स एलआयसी ,ओबीसी महामंडळ अंतर्गत कर्ज सुविधा, मॅक्स लाइफ इन्शुरन्स, प्रधानमंत्री आवास योजना ,दिव्यांग महामंडळ या प्रकारचे अनेक स्टॉल त्या ठिकाणी लावण्यात आलेले होते.
हजारो लोकांनी घेतला मेळाव्याचा लाभ : या रोजगार मेळाव्यामध्ये हजारो युवकांनी सहभाग घेऊन या रोजगार मेळावाचा लाभ घेतलेला आहे .तसेच हजारो नागरिकांनी शासकीय योजनेचा लाभ घेतला. या स्वयंरोजगार मेळाव्याचे उद्घाटन लोकप्रिय आमदार रवी राणा तसेच खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून राज्यसभा खासदार डॉ. अनिलजी बोंडे हे उपस्थित होते. तसेच प्रमुख अतिथी म्हणून समाजसेवक लप्पी भैया जाजोदीया ,मुजफ्फर मामू ,जयंतराव वानखडे युवा स्वाभिमान जिल्हाध्यक्ष जितू दुधाने, अनिल मिश्रा, शैलेंद्र कस्तुरे सुखदेवरावजी तरडेजा शर्मिला मिश्रा सत्येंद्रसिंग लोटे संजय मुनोत बालकिसनजी पांडे कैलास वासेवाय निशी चौबे विनोद गुहे पराग चिमटे राजेश तरडेजा साक्षी उमप तेजलालजी अग्रवाल उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष जाली,कु. जिया वाकोडे यांनी केले .या कार्यक्रमाच्या यशस्वी ची करिता या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक श्री सुरज मिश्रा अनिल मिश्रा शर्मिला मिश्रा पूजा त्रिपाठी यांनी अतिशय मेहनत घेऊन हा रोजगार मिळावा यशस्वी रित्या पार पाडला.
नवनीत राणा यांनी ट्रॅक्टर चालून आनंद लुटला : खासदार नवनीत राणा आपल्या वेगळ्या अंदाजासाठी प्रसिद्ध आहेत. त्या आपल्या खास अंदाजासाठी ओळखल्या जातात. वैशिष्ट्यपूर्ण शैलीमुळे त्या नेहमीच चर्चेत असतात.युवा स्वाभिमान पक्षातर्फे अमरावती शहरातील सायन्स कोर मैदानामध्ये कृषी महोत्सव सुरू आहे. सायंकाळी या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले यावेळी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी चक्क ट्रॅक्टरची स्टेरिंग हातात पकडत ट्रॅक्टर चालून आनंद लुटला. या निमित्ताने महिला कोणत्याही कामात कमी नाही हे या निमित्ताने नवनीत राणांनी ट्रॅक्टर चालून दाखवून दिले. अतिशय चांगल्या पद्धतीने नवनीत राणा यांनी कृषी प्रदर्श येथे ट्रॅक्टरने फेरफटका मारला.