अमरावती - आपल्या मतदारसंघातील सर्वसामान्य लोकांच्या छोट्या मोठ्या शासकीय कामाचा तात्काळ निपटारा व्हावा, यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी मोर्शी वरुड मतदारसंघात राहुटी उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत आमदार आपल्या दारी हा कार्यक्रम राबविला जात आहे. या राहुटी उपक्रमात आमदार देवेंद्र भुयार यांच्यासह सर्व प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहून सर्वसामान्य नागरिकांच्या रखडलेल्या कामाचा निपटारा करत आहे.
ग्रामीण भागातील अडचणी सोडवण्यासाठी आमदार आपल्या दारी हे अभियान राबवण्यात येत असून या अभियाना अंतर्गत आमदार आमदार देवेंद्र भुयार स्वतः ग्रामीण भागात जाऊन तेथील जनतेच्या समस्या जाणून घेत आहेत व त्या सर्व समस्या जागेवरच कशा सोडवता येतील त्यादृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देत आहेत. या अभियानामुळे ग्रामीण भागातील हजारो नागरिकांच्या समस्या या काही मिनिटातच सुटत असल्याने ग्रामीण भागातील नागरिक देखील आता समाधान व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत.
जनतेच्या समस्यांसाठी आमदार देवेंद्र भुयारांचा राहुटी उपक्रम; हजारो तक्रारींचा निपटारा एकाच छताखाली
मतदारसंघातील सर्वसामान्य लोकांच्या छोट्या मोठ्या शासकीय कामाचा तात्काळ निपटारा व्हावा, यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी मोर्शी वरुड मतदारसंघात राहुटी उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत आमदार आपल्या दारी हा कार्यक्रम राबविला जात आहे. याअंतर्गत विविध सरकारी योजनांची माहिती नागरिकांना करण्यात येत आहे.