अमरावती: दुष्काळामुळे शेतीला कंटाळलेले शेतकरी आपली जमीन अतिशय कमी भावात विकायला निघाले होते. अशा परिस्थितीत मियावाकी तंत्रज्ञानाद्वारे आपला परिसर समृद्ध होणार अशी आशा निर्माण होताच शेतकरी नव्या जोमाने आपली शेती कसायला लागले. एकूणच गावात समृद्ध जंगल निर्माण करण्यासाठी ग्रामस्थ एकत्रित आले आणि अमरावती जिल्ह्यात पहिला मियावाकी प्रकल्प Miyawaki Forest Project अंजनगाव सुर्जी येथे साकारला जातो आहे.
अशी आहे मियावाकी संकल्पना: जपानमधील वनस्पती शास्त्रज्ञ अकिरा मियावाकी जंगल समृद्धीसाठी जी संकल्पना मांडली आणि यशस्वी करून दाखवली. ती संकल्पना मीयावा की संकल्पना म्हणून जगभर प्रसिद्ध झाली. स्थानिक प्रजातीच्या वृक्षांचा वापर करून अशा वृक्षांच्या रोपांची दाट लागवड केली जाते. मियावाकी प्रकल्प बऱ्याच कमी किमतीमध्ये हे होऊ शकतो. एखादी अशी जमीन शोधायला लागते की, ज्या जमिनीमध्ये माणसांचं अतिक्रमण नसेल किंवा त्या भागात मानवी संपर्क सर्वा कमी असेल अशा भागात जी झाड आपण लावतो आहे. ती पुढचे 25 ते 30 वर्ष तोडली जाणार नाही. अशी एक जागा या प्रकल्पासाठी निवडणे अत्यंत आवश्यक असल्याचे अंजनगाव सुर्जी येथील डॉ. कौस्तुभ पाटील ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले आहे.
वृक्षांची वर्गवारी: या जागेमध्ये आपल्याला सुरुवातीला जमीन तयार करायची असते. दोन ते अडीच फुटापर्यंत जमीन खोदायची. खोदलेल्या जमिनीमध्ये हिरवा चारा, खत, कुजणारे पदार्थ हे टाकायचं असतात. त्याच्याशिवाय जी वर काढलेली माती आहे. त्या मातीमध्ये आपल्याला गाळ किंवा शेणखत जे पूर्ण मुरलेला आहे. ते मिसळून आणि ती माती पुन्हा त्या खड्ड्यामध्ये भरायची असते. ही अशी जमिनीची तयारी झाल्यावर तीन प्रकारचे वृक्षांमध्ये वर्गवारी करायची आहे .यामध्ये एक उंच वाढणारे 20 फुटांच्यावरचे, दहा ते वीस फुटापर्यंतचे आणि दहा फुटाच्या खालचे अशा तीन प्रकारच्या वृक्षांची वर्गवारी केल्यानंतर आपल्या वातावरणात जे वृक्ष वाढतात त्या वृक्षांची यादी बनवून, आम्ही या प्रकल्पामध्ये 30 प्रकारचे वृक्ष आमचे मेळघाटातले निवडलेले आहेत. जे विविध पद्धतीने पूर्ण उंची घेतात.
10 किलोमीटर पर्यंत पाण्याचा प्रश्न: काही मध्यम उंचीचे असतात काही छोट्या उंचीचे असतात. हे वृक्ष आपल्याला त्या एका ठरलेल्या पॅटर्नमध्ये लावून एक हिरवा घन तयार करावा लागतो. हा हिरवा घन ऑक्सिजन निर्मितीसाठी खूप महत्त्वाचा आहे. जर अशा प्रकारचं 100 एकरचं जंगल आपण बनवू शकलो, तर त्या 100 एकरच्या जंगलाच्या आजूबाजूच्या 10 किलोमीटर पर्यंत पाण्याचा प्रश्न राहत नाही. आणि तिथे पाऊस पण व्यवस्थित पडतो. तिथे विमानाने आर्टिफिशल फवारणी करायची गरज नसते. अशा भागात ही झाडच आपल्याला व्यवस्थितपणे पर्जन्यमान देऊ शकतात. याच्याशिवाय वातावरणाचे तापमान आहे. ते तापमाना आपल्याला कमी करता येतं. दोन ते तीन डिग्रीपर्यंतच टेंपरेचर जंगलामध्ये आणि जंगलाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये असतं. आमची अशी अपेक्षा आहे की, हा पथदर्शी प्रकल्प लोकांनी बघावा याच्यातून प्रेरणा घ्यावी. खूप कमी पैशांमध्ये उलट आणि सरकारी खर्चातून पण बऱ्याचशा प्रमाणात याच्यात मदत होऊ शकते, अशा प्रकारचे प्रकल्प लोकांनी करायला घ्यावेत. तुम्ही फक्त तुमची इच्छाशक्ती दाखवा आमच्याकडून काही मदत लागली तर आम्हाला मदत सांगा आणि काय सरकारकडून आपल्याला काय मदत मिळू शकते. ते आपण सरकारच्याकडून घेऊ आणि अशा प्रकारचे सर्व प्रकल्प तालुक्यामध्ये उभे करू असे देखील डॉक्टर कौस्तुभ पाटील यांनी सांगितले आहे.
अंजनगाव सुर्जीत पथदर्शी प्रकल्प: अंजनगाव सुर्जी येथे 15 ऑगस्ट 2022 ला बोराळा मार्गावर अंजनगाव सुर्जी नगरपरिषद यासह लोकजागर संघटना आणि पर्यावरण प्रेमी जनतेच्या सहकार्याने या प्रकल्पाला सुरुवात झाली. या प्रकल्पामध्ये वर्ड पिंपळ आंबा आणि आणि उंबर या वृक्षांसह गुळवेल, शतावरी, शेवगा, गुलाब, भृंगराज, अश्वगंधा, पर्णबीज, सुरण, अळू, कढीपत्ता, अक्कल काढा, हाडजोड, जास्वंद, पानपिंपरी, अडुळसा, हळद, अद्रक, भुई, आवळा असे औषधी गुण असणाऱ्या वृक्षांची रोप देखील लावण्यात आली आहेत. या सर्व झाडांचे महत्त्व विशद करणाऱ्या माहितीचे फलक प्रकल्प स्थळी लावण्यात आले आहेत. वीस ते पंचवीस वर्षात या ठिकाणी घनदाट असे जंगल निर्माण होईल, अशी आशा अंजनगाव वासियांना आहे.
असे आहे वैशिष्ट्य मियावाकी प्रकल्पात लावण्यात आलेल्या दोन रोपांमध्ये वाढ होण्यासाठी स्पर्धा निर्माण होते. कोण किती वेगात वाढेल. या स्पर्धेतून या प्रकल्पातील रोप लवकरच वृक्षात परिवर्तित होऊन जंगलाचा झपाट्याने विकास होतो. मियावाकी प्रकल्पात विविध झाडांची मुळे आपापसात गुंतल्यामुळे जमिनीखाली मूळ संस्था ही सशक्त होते. मियावाकी प्रकल्पातील वृक्ष त्यांना लागणारे सेंद्रिय खत स्वतःच तयार करतात. मियावाकी प्रकल्पामुळे प्रदूषण चक्रीवादळ धूळ जमिनीची धूप यापासून संरक्षण मिळते. तसेच भूगर्भातील पाणी पातळीत वाढ होते. मियावाकी वन ही प्राणी पक्षी आणि फुलपाखरांसाठी हक्काचा अधिवास आहे यासोबतच औषधी वनस्पतींचे संवर्धन जमिनीच्या सौंदर्य करण्यासाठी हा प्रकल्प अतिशय उपयुक्त ठरतो.