अमरावती - बहुजन क्रांती मोर्चाच्यावतीने बुधवारी नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) विरोधात भारत बंद आंदोलन करण्यात आले. या बंदला अंजनगाव सुर्जी येथे संमिश्र प्रतिसाद मिळाला.
बंद दरम्यान चावडी जवळ व्यापार्यांनी आपली दुकाने उघडली होती. व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवण्यासाठी काही आंदोलकांनी जबरदस्ती केली. व्यापाऱ्यांनी याची माहिती तातडीने पोलिसांना दिली. माहिती मिळाल्यानंतर ठाणेदार राजेश राठोड यांनी, दुकाने जबरदस्तीने बंद करण्याचा प्रयत्न केल्यास कडक कारवाई करण्याचा ध्वनिक्षेपकावरून इशारा दिला. त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने उघडी ठेवली होती.
हेही वाचा - भारत बंद : राज्यात बंदला संमिश्र प्रतिसाद, अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण
बंद दरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.