ETV Bharat / state

अमरावतीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; बदनामीच्या भीतीने मुलीने घेतले उंदीर मारायचे औषध - अल्पवयीन मुलीवर अत्याचार

तिवसा तालुक्यातील मोझरी या गावात २० वर्षीय तरुणाने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना २६ डिसेंबरला उघडकीस आली. सध्या आरोपी फरार असून त्याचा तपास सुरू आहे.

amravati
अल्पवयीन मुलीवर बळजबरीने अत्याचार
author img

By

Published : Dec 30, 2019, 10:58 AM IST

अमरावती - दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचे प्रमाण वाढतच आहे. यातच तिवसा तालुक्यातील मोझरी या गावात एका अल्पवयीन मुलीवर २० वर्षीय तरुणाने अत्याचार केल्याची घटना २६ डिसेंबरला उघडकीस आली. सध्या आरोपी फरार असून त्याचा तपास सुरू आहे.

पोलीस माहितीनुसार, ऋषिकेश वडस्कर (वय 20) रा. मोझरी या तरुणाने गावातील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. संबंधीत अल्पवयीन मुलगी नियमितपणे शाळेतून घरी परत जात असताना तिचा पाठलाग करत रस्त्यात कोणी नसल्याचे पाहून मुलाने तिला बळजबरीने दुचाकीवर बसून स्वतःच्या घरी नेले व अत्याचार केला. त्यानंतर घाबरलेल्या मुलीने बदनामीच्या भीतीने उंदीर मारायचे औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा - तपोवनात पद्मश्री डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांचा १२८ वा जयंती उत्सव उत्साहात

तिला अमरावतीच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिचा जबाब नोंदवण्यात आला. त्यानुसार आरोपी ऋषिकेश विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती आहे.

हेही वाचा - बहिरमच्या यात्रेत मातीच्या हंडीत शिजवतात मटण; खवय्यांची गर्दी

Intro:अल्पवयीन मुलीवर बळजबरीने अत्याचार
तिवसा तालुक्यातील मोझरी येथील घटना.

अमरावती अँकर

अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील गावात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. अल्पवयीन मुलीवर २० वर्षीय तरुणाने बलात्कार केल्याची घटना २६ डिसेंबर रोजी उघडकीस आली.
पोलीस माहितीनुसार ऋषिकेश वडस्कर वय 20 रा.मोझरी या तरुणाने गावातील अल्पवयीन मुलीवर लैगिक अत्याचार केल्याचे समोर आले नियमितपणे अल्पवयीन मुलगी शाळेतून घरी परत जात असताना तिचा पाठलाग करत रस्त्यात कोणी नसल्याचे पाहून मुलाने तिला बळजबरीने दुचाकीवर बसून स्वतःच्या घरी नेले व बलात्कार केला. त्यानंतर मुलीने बदनामीच्या भीतीने उंदीर मारायचे औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, तिला अमरावतीच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्या बयान नुसार आरोपी ऋषिकेश वडस्कर याच्या विरोधात 363, 366, 376, (1), 506, 4, 12. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सध्या फरार आहे.

Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.