अमरावती - मेळघाटातील हरीसाल येथे कार्यरत असलेल्या आरएफओ दिपाली चव्हाण यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यामुळे राज्यभर या घटनेचे पडसाद उमटले आहे. तर दिपालीच्या आत्महत्या प्रकरणी डीएफओ विनोद शिवकुमार याला अटक सुद्धा करण्यात आली. दिपाली चव्हाण यांनी मृत्यपूर्वी पती व आईला लिहलेल्या पत्रात अनेक धक्कादायक आरोप केले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यांना कसा त्रास दिला जात होता, हे त्यांनी पत्रात लिहले आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मोरगाव येथील दिपाली चव्हाण यांच्या कुटुंबाची महिला व बालकल्याण मंत्री व अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी घरी जाऊन भेट घेतली. यावेळी यशोमती ठाकूर यांनी तिच्या कुटूंबियांचे सांत्वन करत त्यांना दिलासा दिला. तर दिपालीच्या आत्महत्येला जे कोणी जबाबदार असतील त्या सर्वांवर कारवाई करण्यात येईल, असं आश्वासन यशोमती ठाकूर यांनी यावेळी दिले.
हेही वाचा - दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण, बदलीसाठी पैसे घेणारा तो नेता कोण?
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे माजी क्षेत्रसंचालक श्रीनिवास रेड्डी यांचा जामीन फेटाळला
बहुचर्चित मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील हरिसाल रेंजच्या आरएफओ दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे माजी क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी यांनी अचलपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, जिल्हा सरकारी वकील परिक्षित गनोरकर यांनी या प्रकरणात श्रीनिवास रेड्डी यांच्यावर गुन्हाच दाखल नाही तर त्यांना अटकपूर्व जामीन कशासाठी अशी बाजू न्यायालयासमोर मांडली. तर श्रीनिवास रेड्डी यांचे वकील वाधवानी यांनी रेड्डी यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते त्यामुळे अटकपूर्व जामीन मिळावा अशी न्यायालयापुढे विनंती केली होती. दोन्ही पक्षांची बाजू ऐकून अचलपूर जिल्हा सत्र न्यायालयाने यांनी श्रीनिवास रेड्डी यांचा जामीन अर्ज फेटाळला.
हेही वाचा - उपवनसंरक्षक विनोद शिवकुमारला बडतर्फ करा; वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची मागणी
प्रकरणाचा तपास वरिष्ठ महिला आयपीएस पोलीस अधिकार्यांकडेमेळघाटातील हरिसाल च्या आरएफओ चव्हाण यांनी डीएफओ विनोद शिवकुमार यांच्या त्रासाला कंटाळून 25 मार्च रोजी आत्महत्या केली. या प्रकरणात तत्कालीन मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी यांच्याकडे विनोद शिवकुमार यांच्या वारंवार तक्रारी करून सुद्धा त्यांनी शिवकुमार यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. आपल्याला न्याय मिळणार नाही या भावनेतून दीपाली चव्हाण यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. या प्रकरणात निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी महिला पोलीस आयपीएस अधिकाऱ्यांकडून तपास करण्यात यावा अशी मागणी भाजप व वनरक्षक, वनपाल, रेंजर फॉरेस्ट असोसिएशन ने केली होती. अखेर शासनाने वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रज्ञा सरवदे यांच्याकडे दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास दिला आहे तसे आदेश वन विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक अरविंद आपटे यांनी काढले आहे. प्रज्ञा सरवदे या १९८९ बॅच च्या आयपीएस आहेत. सुरुवातीला ६ वर्षे त्यांनी पश्चिम बंगाल येथे नोकरी केली. १९९६ ते २००० दरम्यान त्यांनी सीबीआय मध्ये महत्वाची जबाबदारी पार पाडली.