ETV Bharat / state

'भाजपच्या लोकांनी आधी संस्कार शिकावे; नाही तर आम्ही तुमची थोबाडं फोडली असती'

पालकांनी मुलीवर योग्य संस्कार केले नसल्याने बलात्काराच्या घटना घडत असल्याचे बेताल वक्तव उत्तर प्रदेश मधील एका भाजप आमदाराने केले होते. त्यावर महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी भाजपने आधी आपल्या लोकांना संस्कार शिकवावे; आमच्यात संस्कार आहेत म्हणून आम्ही तुमची थोबाड फोडली नाहीत,अशी टीका केली आहे.

Congress minister Yashomati Thakur
'भाजपच्या लोकांनी आधी संस्कार शिकावे
author img

By

Published : Oct 5, 2020, 10:02 AM IST

अमरावती - भाजपने आधी त्यांच्याच पक्षातील लोकांना संस्कार शिकवावे. आमच्यात संस्कार आहेत म्हणून आम्ही तुमची थोबाड फोडली नाहीत, अशी टीका राज्यांच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली आहे. मुलींवर योग्य संस्कार होत नसल्याने मुलींवर बलात्कार होतात. अशा घटनांना सरकार आणि तलवारीने रोखणं अशक्य आहे, अशी मुक्ताफळं भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांनी हाथरस प्रकरणावर उधळली होती. त्यावर यशोमती ठाकूर यांनी ही जोरदार टीका केली.

'भाजपच्या लोकांनी आधी संस्कार शिकावे

ठाकूर म्हणाल्या, मुलींवर संस्कारावर बोट ठेवणाऱ्या भाजप आमदारांच्या पक्षाचे कित्येक लोक कित्येक प्रकरणात सापडतात. कुणाची सीडी बाहेर निघते तर आणखी कुणाचे काही. आम्हा महिलांनी कसे राहायचं हे अजिबात शिकवू नये, उत्तर प्रदेश मधील भाजपच्या त्या मुक्ताफळे उधळणाऱ्या आमदाराला राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी सुनावलं आहे.

उत्तर प्रदेश मधील हाथरस मधील बलात्कार प्रकरणी देशभरात संतापाची लाट असताच भाजपचे स्थानिक आमदार सुरेंद्र सिंह यांनी शनिवारी मुक्ताफळे उधळली आहेत. सरकार आणि तलवार अत्याचार रोखू शकत नाही. आई-वडिलांनी आपल्या तरुण मुलीला संस्कारी वातावरणात राहण्याची पद्धत शिकवायला हवी, असे वक्तव्य सुरेंद्र सिंह यांनी केले होते. एवढंच नाही तर हाथरस मध्ये अत्याचार झालाच नव्हता शवविच्छेदनातून त्याला दुजोरा मिळाला आहे, असेही सिंह म्हणाले होते. त्यामुळे भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांच्यावर देशभरातून टीका होत आहे.

या वाचाळवीर आमदारावर टीका करताना मंत्री ठाकूर म्हणाल्या आमच्यावर संस्कार आहेत म्हणून आम्ही सावित्री बनलो, रमाबाई बनलो. या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिराजी बनल्या. पहिल्या राष्ट्रपती या माझ्या अमरावती जिल्ह्यातील आहेत. आमच्यात संस्कार आहेत म्हणून आम्ही तुमची थोबाडे फोडली नाहीत. आमचा संयम आमची कमजोरी समजू नका, कोणतीही महिला कमजोर नसते. वेळ आली की ती दुर्गेच रूप धारण करू शकते. त्यामुळे खरी शिकवण महिलसोबत पुरुषांना देखील देणे गरजेच असल्याचेही यशोमती ठाकुर म्हणाल्या.

हाथसर बलात्कार प्रकरणातील पुरावे नष्ट करन्याचा प्रयत्न तेथील राज्य सरकारच्या वतीने केला जाऊ शकतो. तसेच त्या पीडितेच्या कुटूंबाच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे या प्रकरणाचा तपास सुप्रीम कोर्टाने दुसऱ्या राज्याकडे सोपवावा, अशी मागणी राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.