ETV Bharat / state

सुनिल केदार त्यांच्या मागणीवर ठाम; तर यशोमती ठाकूर यांची राहुल गांधींना अध्यक्ष करण्याची मागणी

राज्याचे दूग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी मुकुल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण, मिलिंद देवरा यांच्यावर टीका केली आहे. दरम्यान, राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी ट्विट केले आहे. तर सुनिल केदार त्यांच्या वक्तव्यावर ठाम आहेत.

minister-yashomati-thakur-and sunil kedar
सुनिल केदार त्यांच्या मागणीवर ठाम; तर यशोमती ठाकूर यांची राहुल गांधींना अध्यक्ष करण्याची मागणी
author img

By

Published : Aug 24, 2020, 11:51 AM IST

Updated : Aug 24, 2020, 12:39 PM IST

नागपूर - आज दिल्लीत होणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीपूर्वी राज्यातील काँग्रेस नेत्यांमध्ये नेतृत्वाच्या मुद्यावरून मतभेद झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. रविवारी राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी एक ट्विट करत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक आणि मिलिंद देवरा यांना सोनिया गांधी यांची माफी मागण्याचा सल्ला दिला होता. त्यांनी तसे न केल्यास राज्यातील काँग्रेस कार्यकर्ते त्यांना राज्यात फिरू देणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला होता. त्यांच्या या ट्विटनंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. आज सुनील केदार यांनी काल केलेल्या ट्विटचा पुनरुच्चार केला आहे.

राज्याचे दूग्धविकास मंत्री सुनील केदार बोलताना..

'मी माझी भूमिका काल ट्वीटच्या माध्यमातून व्यक्त केली आहे, आजही मी त्याच भूमिकेवर कायम आहे. महाराष्ट्रातील ज्या बुद्धीवंत नेत्यांनी सोनिया गांधी यांच्याबद्दल चुकीचे मत व्यक्त केले. त्यामुळे मी कार्यकर्त्यांच्या मनातील भावना व्यक्त केली,' असे केदार म्हणाले. या तीन नेत्यांनी त्यांच्या पत्रातून जे म्हटले, त्यातून त्यांची भूमिका स्पष्ट होते. पक्षाने त्यांच्याबद्दल कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. मला आणि जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना वाटते की सोनिया गांधी यांनीच काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदावर कायम राहावे, त्याच पक्षाचे योग्य नेतृत्व करू शकतात, असे मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.

दरम्यान, देशातील काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीवरून राज्यातील काँग्रेसमध्ये दुफळी निर्माण झाली आहे. असे असतानाच "गांधी" हे कुटुंब नाहीतर ते भारताचे 'डीएनए' आहेत. राहुल यांनी पक्षाचे नेतृत्व करावे, असा विचार सोनिया गांधींनी केला असेल तर राहुल यांनीच पक्षाच नेतृत्व केले पाहिजे. भारताला राहुल गांधींची गरज आहे, अशा आशयाचे ट्वीट राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री व कॉंग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी केले आहे.

काँग्रेस पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून काँग्रेस पक्षाध्यक्ष बदलण्याची मागणी केली होती. त्यामुळे राज्यातील काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याने दुफळी निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राज्याचे दूग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी मुकुल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण, मिलिंद देवरा यांच्यावर टीका केली आहे. दरम्यान, राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी ट्विट केले आहे.

महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर

Last Updated : Aug 24, 2020, 12:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.