ETV Bharat / state

10th and 12th examinations 2022 : दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलणार?, राज्यमंत्री बच्चू कडू यांचे संकेत - 10 आणि 12 वी च्या परीक्षा 2022

मार्च महिन्यात होणाऱ्या 10 आणि 12 वी च्या परीक्षा एक महिना पुढे ढकलावी, अशी सूचनाही कडू यांनी शिक्षण उपसंचालकांसोबत झालेल्या ऑनलाइन बैठकीत केली.

राज्यमंत्री बच्चू कडू
राज्यमंत्री बच्चू कडू
author img

By

Published : Jan 29, 2022, 12:11 AM IST

अमरावती - मार्च महिन्यात होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षा एप्रिल महिन्यात घेण्यात याव्यात अशा सूचना राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केल्या आहेत. (possibility of postponing the 10th and 12th examinations) मार्च महिन्यात होणाऱ्या 10 आणि 12 वी च्या परीक्षा एक महिना पुढे ढकलावी, (Bachchu Kadu) अशी सूचनाही कडू यांनी शिक्षण उपसंचालकांसोबत झालेल्या ऑनलाइन बैठकीत केली.

प्रतिक्रिया

ऑनलाइन-ऑफलाईनचा घोळ सुरू आहे

मागील दोन वर्षांच्या काळात शालेय विद्यार्थ्यांना अभ्यास आणि लिखाणाचा सराव झालेला नसल्याने ही मागणी केली जात होती. मुलांचा लिखाणाचा सराव सुटल्याने त्यांना परीक्षेत अडचणी निर्माण होऊ शकतात. (Minister of State Bachchu Kadu) तसेच, राज्यात सध्या शाळांबाबत ऑनलाइन-ऑफलाईनचा जो काही घोळ सुरू आहे त्यामुळे देखील विद्यार्थी संभ्रमात आहेत. म्हणून मार्च महिन्यात होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षा एप्रिल महिन्यात घेण्यात याव्या अशा सूचना कडू यांनी या बैठकीत केल्या. या ऑनलाईन बैठकीला शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी यांच्यासह शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

ऑनलाईन अभ्यासक्रम किती टक्के पूर्ण करण्यात आला

परीक्षा प्रक्रिया राबवितांना सीबीएससी बोर्ड प्रमाणे परीक्षा घेता येतील का, याचेही नियोजन करण्यात यावे. तसेच ऑनलाईन अभ्यासक्रम किती टक्के पूर्ण करण्यात आला आहे. याबाबतचा सविस्तर अहवाल त्वरीत सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधितांना दिल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या लसीकरणाबाबत नियोजनपूर्वक कार्यपध्दती राबवावा, कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी वयोगट 15 ते 18 मधील विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरु आहे.

परीक्षांच्या तारखा पुढे करता आल्यास विद्यार्थ्यांना वेळ मिळेल

जिल्ह्यामध्ये या लसींचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. या लसीकरणाला वेग येण्यासाठी शिक्षण आणि आरोग्य विभागाने समन्वयाने काम करावे. जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांचे लसीकरण व्हावे, यासाठी मायक्रोप्लॅनिंग करण्यात यावे. या परीक्षांच्या तारखा पुढे करता आल्यास विद्यार्थ्यांना वेळ मिळेल. यासाठी शिक्षण विभाग, विद्यार्थी तसेच पालक यांच्यात समन्वयाने पुढील कार्यपध्दती निश्चित करण्यात यावी. तसेच, याबाबतचा अहवाल येत्या आठ दिवसात सादर करावा, असेही ते यावेळी म्हणाले.

दत्तक योजनेबाबतही संबंधितांशी चर्चा

शासनातर्फे महिलांसाठी संजय गांधी निराधार योजना तसेच बाल संगोपन निधी योजना राबविण्यात येते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्या महिला व त्यांची अपत्ये या योजनेत बसणार नाहीत त्यांना शैक्षणिक मदत करण्यात येईल. अनाथ आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील एकल महिलांना प्रामुख्याने या योजनेचा लाभ देण्यात येईल. विद्यार्थी दत्तक योजनेबाबतही राज्यमंत्री कडू यांनी संबंधितांशी यावेळी चर्चा केली.

हेही वाचा - BJP MLAs Suspension Quashes : सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय राज्य सरकारवर बंधनकारक - चौसाळकर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.