ETV Bharat / state

आम्हाला स्वगृही पाठवा; परप्रांतीय मजुरांचा अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जमाव - कोरोना व्हायरस

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काम करणाऱ्या उत्तर प्रदेश आणि बिहार येथील मजुरांनी 'आम्हाला स्वगृही पाठवा' अशी मागणी करत अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय गाठले.

migrant workers gather outside Amravati Collectorate
परप्रांतीय मजुरांचा अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जमाव
author img

By

Published : May 4, 2020, 8:22 PM IST

अमरावती - कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काम करणाऱ्या उत्तर प्रदेश आणि बिहार येथील मजुरांनी 'आम्हाला स्वगृही पाठवा' अशी मागणी करत अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. मोठ्या संख्येने परप्रांतीय मजूर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जमा झाल्याने काही वेळ चांगलाच गोंधळ उडाला होता.

परप्रांतीय मजुरांचा अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जमाव...

हेही वाचा... 'स्थलांतरित मजुरांना राज्यात घेण्यास मुख्यमंत्री योगी अडचण निर्माण करत आहेत'

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यातील जवळपास तिनशेच्या आसपास मजूर कामाला आहे. कोरोनामुळे आता कृषी उत्पन्न बाजार समिती बंद असल्याने या मजुरांना काम नाही आणि पैसाही नाही. त्यामुळे त्यांना आता घरी जाण्याचे वेध लागले आहे. यामुळेच आज (सोमवार) हे मजूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे आले होते. अडीचशे ते तीनशे मजुरांसाठी रेल्वेगाडी सुरू करता येणार नाही, अशी माहिती त्यांना कुठुन तरी मिळाल्यामुळे त्यांचा रोष उफाळून आला होता. तसेच हे मजूर या ठिकाणी पोहचल्यानंतर त्यांना योग्य मार्गदशन करणारे कोणीही नसल्याने ते चांगलेच संतापले. यानंतर काही जणांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतल्यावर व्यवस्था होईल, नियमानुसार ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण करा, असे त्यांना सांगितले. त्यानंतर हे परप्रांतीय मजूर काहीसे शांत झाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.