अमरावती - राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. मध्यरात्रीपासून निकाल संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या परीक्षेत यशस्वी कामगिरी करत अमरावतीचा सिद्धेश अग्रवाल 99.99 टक्के गुणांसह प्रथम आला आहे.
अमरावती शहराच्या शारदा विहार परिसरात वास्तव्यास असलेल्या अग्रवाल कुटुंबीयांना दोन मुले आहेत. सिद्धेश लहानपणापासूनच चिकाटी आणि जिद्दीने अभ्यास करतो. एमएचटी सीईटी परीक्षेसाठी लावलेल्या कोचिंग क्लासेसमध्ये तो जास्तीत जास्त वेळ अभ्यास करत होतो. यामुळेच त्याला हे यश प्राप्त झाल्याचे त्यांच्या पालकांनी सांगीतले. ते पुढे म्हाणाले मुलाला मिळालेले हे यश पाहून आपल्याला आनंद झाला आहे. स्पर्धात्मक परीक्षांची तयारी केल्यास विद्यार्थ्यांना नक्कीच यश मिळते, असे मत सिद्धेशच्या पालकांनी व्यक्त केले आहे. या निकाला बंद्दल बोलताना त्यांने सध्या दहावी आणि बारावीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करून मन लावून अभ्यास केल्यास यश नक्की मिळेल असा दिला आहे.
राज्याच्या प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेतलेल्या एमएचटी सीईटी परीक्षेसाठी राज्यातून ४ लाख १३ हजार २८४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील तीन लाख ९२ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली, तर २०, ९३० विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित राहिले. पीसीएम (फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स) विभागातून २ लाख ७६ हजार १६६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर पीसीबी (फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी) या विभागातून २ लाख ८१ हजार १५४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.