ETV Bharat / state

दिवाळीच्या सुट्ट्या आणि गुलाबी थंडीची मजा; मेळघाटात पर्यटकांची गर्दी - मेळघाट पर्यटन

Melghat Tourism: दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील चिखलदरा, कोलकास, सेमाडोह, आमझरी या पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी वाढली आहे. (Crowd of Tourists in Melghat) पर्यटक येथील गुलाबी थंडीचा आनंद लुटत असून राज्याच्या विविध भागातून पर्यटक सातपुडा पर्वत रांगेतील जंगल परिसर पाहण्यासाठी मोठ्या संख्येने आले आहेत. तसेच अनेक जण मेळघाटातील आदिवासी संस्कृती जवळून पाहण्यासाठी देखील मेळघाटातील दुर्गम गावात पोहोचले आहेत. (Joy of Tribal Culture in Melghat)

Melghat Tourism
मेळघाटात पर्यटकांची गर्दी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 19, 2023, 4:12 PM IST

मेळघाटातील पर्यटनाविषयी प्रतिक्रिया देताना पर्यटक

अमरावती Melghat Tourism: मेळघाटातील सर्वांत मोठे पर्यटन स्थळ असणाऱ्या चिखलदरा येथे पर्यटक मोठ्या संख्येने आले आहेत. चिखलदरा येथील पंचबोल पॉईंट, देवी पॉईंट, गाविलगड किल्ला या प्रमुख पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. तसेच येथील स्कायवॉक पॉईंट देखील पर्यटकांसाठी कुतुहलाचे केंद्र ठरत आहे. चिखलदऱ्यासह कोलकास येथे हत्ती सफारीसाठी पर्यटक लहान मुलांसह गर्दी करीत आहेत.

आमझरी येथील साहसी खेळाचा आनंद: वनविभागाच्या वतीनं चिखलदरापासून जवळच असणाऱ्या आमझरी या पर्यटन केंद्रावरील सर्व संकुल पुढील पाच दिवसांसाठी आरक्षित आहेत. येथे असणाऱ्या साहसी खेळांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक विदर्भाच्या विविध जिल्ह्यांसह पुणे, मुंबई, नाशिक या भागातून देखील आले आहेत.

आदिवासी संस्कृतीसोबत रममान: अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्याच्या स्वराज्य सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं चिखलदरा तालुक्यात येणाऱ्या दुर्गम अशा मनभंग गावात ग्रामस्थांसोबत खास दिवाळी स्नेहमिलन सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्यात अमरावती, नागपूर, पुणे, मुंबई अशा विविध शहरातून वन्यप्रेमी सहभागी झालेत. मनभंग या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना नवीन कपडे यावेळी वितरित करण्यात आले. तसेच गावातील आदिवासी बांधवांसोबत आदिवासी नृत्यावर थिरकण्याचा आनंद देखील अनेक पर्यटकांनी लुटला.

माजी विद्यार्थ्यांचे स्नेहमिलन: अकोला येथील जिल्हा परिषद शाळेच्या 1989 च्या दहावीच्या बॅचचे विद्यार्थी हे गत पाच वर्षांपासून दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये मेळघाटात एकत्रित येतात. यावर्षी सध्या राज्याच्या विविध शहरांमध्ये राहणारे 35 ते 40 माजी विद्यार्थी मेळघाटात एकत्र आले आहेत. आम्ही मेळघाटात दिवाळीनंतर चार ते पाच दिवस एकत्रित येतो. चिखलदरा, सेमाडोह, कोलकास या भागातील पर्यटनाचा आम्ही आनंद लुटून लहानपणीच्या गमतीजमतींना उजाळा देतो, असे श्याम घुसरकर 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाले.

हेही वाचा:

  1. भारतीय संघाला शुभेच्छा देण्यासाठी गुडलक चौकात भव्य रांगोळी तर मनसेकडून दुग्धाभिषेक, पहा व्हिडिओ
  2. भारतीय संघ फायनल जिंकला की म्हणताल मोदींमुळेच जिंकलो- संजय राऊत यांनी श्रेयवादावरून भाजपाची उडविली खिल्ली
  3. विश्वचषक विजेत्या संघात पराभूत झाले तरी खेळाडू होणार कोट्याधीश; जाणून घ्या बक्षिसाची रक्कम

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.