ETV Bharat / state

Married Woman Suicide : मला माफ करा म्हणतं विवाहितेने लग्नाच्या पहिल्याच वाढदिवसाला घेतला गळफास - Domestic violence

अमरावतीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मला माफ करा, म्हणतं विवाहितेने लग्नाच्या पहिल्याचं वाढदिवसाला गळफास (Married Woman suicide in amravati) घेतला.

Married Woman suicide
मला माफ करा म्हणतं विवाहितेने लग्नाच्या पहिल्याचं वाढदिवसाला घेतला गळफास
author img

By

Published : Nov 24, 2022, 3:05 PM IST

अमरावती: लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी एका विवाहितेने गळफास घेऊन आपले जीवन संपवल्याची (Married Woman suicide in amravati) घटना शहरात घडली आहे. या प्रकरणी मृत महिलेचा पती, दीर आणि एका महिलेविरुद्ध कौटुंबिक छळ (Domestic violence) व आत्महत्या प्रवृत्त केल्याप्रकरणी नांदगाव पेठ पोलिसांनी याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

घडलेला प्रकार: लग्नाचा वाढदिवस असल्याने मृतक स्नेहल व नवरा गोविंद दोघेही चिखलदरा येथे गेले होते. आणखी एक दिवस येथेच थांबू असे स्नेहलने पती गोविंदाला म्हटले. मात्र, नवऱ्याने वाद घालून स्नेहलला अमरावतीत परत आणले. त्याच दिवशी स्नेहलने सायंकाळच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी तिने वडिलांना पप्पा.. 'आय एम सॉरी' असा मेसेजदेखील टाकला. परंतु, कामाच्या गडबडीत त्यांनी तो बघितला नाही.

वडिलांच्या तक्रारीनुसार, पती व सासरच्या मंडळींनी एक लाख रुपयांची मागणी करून स्नेहलचा वारंवार शारीरिक व मानसिक छळ केला. त्रासाला कंटाळून आपल्या मुलीने आत्महत्या केल्याची तक्रार मृत मुलीच्या वडिलांनी दिली आहे. दरम्यान, आत्महत्येपूर्वी स्नेहलने माझा खूप मानसिक छळ होतो आहे. असा मेसेज केल्याची वडीलांनी सांगितले.

स्नेहल गोविंद सावध. रा.गणेश नगर, अमरावती असे मृत विवाहितेचे नाव आहे. स्नेहल व गोविंद यांचा 21 नोव्हेंबर 2021 ला विवाह झाला होता. त्यानंतर गोविंद व त्यांच्या कुटुंबातील सदस्य तिला त्रास देत होते. माहेर वरून एक लाख रुपये घेऊन ये असा तगादा लावून तिचा अनन्वित मानसिक छळ करण्यात आला होता. असेही तिच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.