ETV Bharat / state

दोन हजार फुट खोल दरीत उडी घेऊन जोडप्याने संपवले जीवन, अमरावतीतील धक्कादायक प्रकार - amravati

घरगुती वादाला कंटाळून राधा तीन आठवड्यापूर्वी तिच्या माहेरी मोथा या गावी निघून गेली होती. गणेशने राधाची समजून काढून तिला परत आणले. परत येताना चिखलदरा येथील दरीत उडी घेऊन त्यांनी जीवन संपवले.

चिखलदरा दरी
author img

By

Published : May 1, 2019, 1:13 PM IST

Updated : May 1, 2019, 1:42 PM IST

अमरावती - कुटुंबातील वादाला कंटाळून विवाहीत जोडप्याने आत्महत्या केल्याची घटना अमरावतीत घडली आहे. चिखलदरा येथील दोन हजार फुट दरीत उडी घेऊन या दोघांनी आत्महत्या केली. राधा आणि गणेश हेकडे असे आत्महत्या केलेल्या जोडप्याचे नाव आहे.

राधा (वय २२) आणि गणेश (वय २५) शहापूर येथील रहिवासी होते. दोन वर्षांपूर्वीच त्यांचे लग्न झाले होते. घरगुती वादाला कंटाळून राधा तीन आठवड्यापूर्वी तिच्या माहेरी मोथा या गावी निघून गेली होती. गणेशने राधाची समजून काढून तिला परत आणले. परत येताना चिखलदरा येथील दरीत उडी घेऊन त्यांनी जीवन संपवले. त्या दोघांना एक छोटा मुलगा आहे.

माहेरच्या घरातून थोड्या अंतरावर आल्यावर राधाने तिच्या काकाला फोन लावला. आम्ही दोघे आत्महत्या करणार असल्याचे तिने सांगितले. यानंतर दोघांनीही त्यांचे फोन बंद करुन ठेवले. त्यामुळे ते त्यांच्या मागावर होते. गणेश आणि राधा दुचाकीवर बसून शहापूरला गेले असे त्यांना वाटले. पण, ते तिथे आढळून न आल्याने त्यांनी चिखलदरा पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी भीमकुंडावर जाऊन पाहणी केली. तेव्हा दोघांनीही आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. या दरीत आधीही आत्महत्या झाल्या आहेत.

Intro:दोन हजार फूट खोल दरीत उडी टाकून पती पत्नीची आत्महत्या, अमरावती जिल्ह्यातील चिखलधारा येथील धक्कादायक घटना.

अँकर
कुटुंबातील घरगुती वादातून अमरावती जिल्ह्यातील शहापूर येथील पती पत्नीने अमरावती जिल्ह्यातील चिखलधारा येथील दोन हजार फूट खोल दरी असलेल्या भीमकुंडात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी साडे आठच्या सुमारास घडली आहे. अमरावती जिल्ह्यातील शहापूर येथील गणेश हेकडे वय 25 व राधा गणेश हेकडे वय 22 असे आत्महत्या करणाऱ्या पती पत्नीचे नाव आहे.

Vo
तीन आठवड्या पूर्वी राधा ही माहेरी गेली होती .पती गणेश हा आज त्याच्या सासरी मोथा या गावी जाऊन पत्नीची पतीने समजूत काढून अमरावती जिल्ह्यातील पर्यटन केंद्र असलेल्या चिखलदरा येथील भीम कुंडावर आणून दोघांनीही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी आठ वाजताच्या दरम्यान घडली. आत्महत्या करणाऱ्या गणेश हेकडे व राधा हेकडे या दोघांचेही दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. गणेश कुस्तीपटू असल्याची माहिती आहे. घरगुती वादातून तीन आठवड्यापूर्वी कौटुंबिक वादातून गणेश ची पत्नी राधा ही माहेरी गेली होती. सततच्या वादातून कंटाळा आल्याने त्यांनी बुधवारी सकाळी मोथा या गावी सासरी येऊन गणेशने राधाला दुचाकीवर बसून चिखलदऱ्याच्या भीमकुंड दरी जवळ भीमकुंड दरीत जाऊन आत्महत्या करणार असल्याचे त्यांनी राधाच्या काका लाही सांगितले त्यामुळे राधा चे काका त्यांच्या मागावर होते त्यानंतर दोघेही शहापूर येथे गेले असा संशय त्यांना आला पण ते शहापूर मध्ये नसल्याने त्यांनी लागलीच चिखलदारा पोलिसात तक्रार केली घटनेचे गांभीर्य पाहता पोलिसांनी भीमकुंड वर जाऊन पाहणी केली असता दोघांनीही आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे चिखलदराच्या भीमकुंड पॉईंट वर याआधी अनेक आत्महत्या झाल्या आहेBody:अमरावतीConclusion:अमरावती
Last Updated : May 1, 2019, 1:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.